Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Deposit Interest Rate: काय म्हणता? मुदत ठेवीवर 9.5% व्याजदर देतायेत या बँका, चेक करा डीटेल्स

Fixed Deposit

Image Source : www.indusind.com

अनेक लोक गुंतवणुकीसाठी योग्य त्या पर्यायांचा शोध घेत असतात. त्यातल्या त्यात मुदत ठेव ही गुंतवणुकीसाठीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) म्हणजे अशी गुंतवणूक, जिथे ठराविक कालावधीसाठी तुम्ही तुमचे पैसे गुंतवता आणि त्यांनतर ग्राहकांना निर्धारित व्याजदरानुसार परतावा दिला जातो. चांगला परतावा देणाऱ्या बँकांची माहिती घ्या या लेखात...

सध्या अनेकांना बचतीचे महत्व पटले आहे. आपल्या कमाईचा हिस्सा योग्य ठिकाणी गुंतवला तर भविष्यात त्याचा तोग्य परतावा मिळू शकतो हे आता अनेकांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक लोक गुंतवणुकीसाठी योग्य त्या पर्यायांचा शोध घेत असतात. त्यातल्या त्यात मुदत ठेव ही गुंतवणुकीसाठीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) म्हणजे अशी गुंतवणूक, जिथे ठराविक कालावधीसाठी तुम्ही तुमचे पैसे गुंतवता आणि त्यांनतर ग्राहकांना निर्धारित व्याजदरानुसार परतावा दिला जातो.

रिझर्व बँक ऑफ इंडिया दर तिमाहीत त्यांचे पतधोरण जाहीर करत असते. त्यानुसार कर्जावरील रेपो रेट दर ठरवले जातात. रेपो रेट वाढला की कर्जावरील व्याजदर देखील वाढते. मागील पतधोरण बैठकीत RBI ने रेपो रेट वाढवलेला नाहीये. 6.25% या रेपो रेटने सध्या कर्ज दिले जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बचतीचे पैसे आहेत, त्यांच्यासाठी ही गुंतवणुकीची चांगली संधी आहे असे मानले जाते. कारण व्याजदर वाढले असल्यामुळे, गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर दिले जात आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI कर्ज महाग करते आणि व्याजदर अधिक देते, जेणेकरून नागरिकांना बचतीची सवय लागेल!

तर हे झाले व्याजदराचे गणित, जर तुम्हाला मुदत ठेव अर्थात FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या लेखात आकर्षक व्याजदर देणाऱ्या 2 बँकांची माहिती आम्ही तुम्हांला देणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे…

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Sarvodaya Small Finance Bank)

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सात दिवस ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ग्राहकांना 4 टक्के आणि 9.1 टक्के दरम्यान एफडी व्याज दर देते आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक व्याजदर त्याच कालावधीसाठी 4.5 टक्के ते 9.6 टक्के इतके आहे. सदर बँक पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.1 टक्के व्याजदर देते आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, नियमित ग्राहक आता 5 वर्षांच्या ठेवींवर 9.10 टक्के व्याजदर घेऊ शकतात, तर ज्येष्ठ नागरिक 9.60 टक्के उच्च दराचा लाभ घेऊ शकतात.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन एफडी व्याजदर ग्राहकांसाठी 4.5 टक्के ते 9 टक्के दरम्यान आहेत.याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकता. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे ज्येष्ठ नागरिक 1001 दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवलेल्या एफडीवर वार्षिक 9.5 टक्के व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. 1001 दिवसांच्या कालावधीसाठी बँकेकडून सर्वाधिक म्हणजेच 9 टक्के व्याजदर दिला जातो आहे.

तेव्हा, तुम्ही मुदत ठेव गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर हे दोन पर्याय तुम्हांला चांगला परतावा मिळवून देऊ शकतात. इतर बँकेचे व्याजदर जाणून घेण्यासाठी तुम्ही नजीकच्या कुठल्याही बँकेत जाऊन चौकशी करू शकता किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्याबद्दल माहिती घेऊ शकता.