Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharera: बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 563 डेव्हलपर्सवर महारेराची कारवाई

Maharera

Image Source : www.homebazaar.com

MAHARERA Action Against Developers: गृहनिर्माण प्रकल्प बनवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 563 रिअल इस्टेट कंपन्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (Maharera) राज्यातील 563 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांना त्यांच्या प्रकल्पांशी संबंधित माहिती अपडेट न केल्याबद्दल कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

Building Construction Norms: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (Maharera) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 563 प्रकल्प डेव्हलपर्सची नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. प्रकल्प डेव्हलपर्सनी 22,449 कोटी रुपयांच्या 50,288 अपार्टमेंटचे तपशील अपडेट केलेले नाहीत.

50,288 अपार्टमेंटचा समावेश

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने सांगितले की, त्यांनी एकूण 563 गृहनिर्माण प्रकल्पांच्या डेव्हलपर्सला प्रकल्प तपशील (माहिती) अपडेट न केल्याबद्दल आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. हे एकूण 746 नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचा भाग आहेत, ज्यात सुमारे 22,449 कोटी रुपयांच्या 50,288 अपार्टमेंटचा समावेश आहे, ज्यांची जानेवारीमध्ये महारेराकडे नोंदणी करण्यात आली होती.

ग्राहकांची होऊ शकते फसवणूक

रिअल इस्टेट कायदा 2016 नुसार, एकदा महारेरा नियामकाकडे प्रकल्पाची नोंदणी झाल्यानंतर, नोंदणीच्या वेळी प्रकल्पाच्या प्रवर्तकाने (Promoter) प्रदान केलेली काही माहिती दर 3 महिन्यांनी आणि आर्थिक तपशील वर्षातून एकदा अपडेट करणे आवश्यक आहे. हे तपशील अपडेट न करून, डेव्हलपर्स घर खरेदी करणाऱ्यांची दिशाभूल करतात, ज्यामुळे ग्राहकांना कधीकधी फसवणूक झाल्याचे जाणवते.

महारेराचा सर्वत्र वॉच

महारेरा प्रमुख अजोय मेहता यांच्या सूचनेनुसार तपासानंतर सर्व प्रकल्प प्रवर्तकांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. नियामक संस्थेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीपासून प्रकल्पाच्या आर्थिक प्रगती अहवालावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. असे करून, महारेरा या क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे महारेराकडे घर खरेदीदारांना प्रकल्पाशी संबंधित सर्व तपशील देखील मिळू शकतात.

विकासक वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहेत

दिल्ली एनसीआरमधील विकासक RERA टाळण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत, ज्यामध्ये बिल्डर चार वेगवेगळ्या मालकांना 25 टक्के हिस्सा देऊन जमिनीची नोंदणी करत आहेत आणि नंतर ते RERA च्या कक्षेत येऊ नयेत म्हणून बांधकाम सुरू करतात. उदाहरणार्थ, 1,000 चौरस यार्ड जमीन असल्यास, ती चार मालकांमध्ये विभागली जाते आणि नंतर विकसित केली जाते. विकसित क्षेत्र 500 चौरस मीटरपेक्षा जास्त नसावे आणि विकासकाला नोंदणीतून सूट दिली जाईल. ही युक्ती करणाऱ्यांवर रेरा लक्ष ठेवून आहे.