Dinesh Vijan Apartment: आजकाल आलिशान घरांची किंमत कोटी रुपयांच्या पूढे गेलेली आहे. त्यातही मुंबईच्या पाली हिल्स परिसरात उभारल्या जाणाऱ्या आलिशान अपार्टमेंट्सला मुंबईतल्या श्रीमंतां वर्गाची पसंती दिसून येत आहे. फिल्म क्षेत्रातील अनेक मंडळी आणि उद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजकांनी येथे आपले केवळ एक नव्हे तर अनेक फ्लॅटस खरेदी केले असल्याची माहिती आहे. त्यातच आता प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक दिनेश विजन यांची भर पडलेली आहे. दिनेशने मुंबईच्या पाली हिल्स परीसरात 103 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. यासाठी त्याने 6.17 कोटी रुपये एवढी या बंगल्याची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
यशस्वी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक
बॉलिवूडचे सुप्रसिध्द चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक दिनेश विजन यांनी Rustomjee Group कडून मुंबईच्या पाली हिल्स येथे 103 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. दिनेश यांनी आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपट बॉलिवूडला दिलेत. त्यांनी तयार केलेले अनेक चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारे आणि हास्यविनोदात खिळवून ठेवणारे असतात.
स्टॅम्प ड्युटीसाठी 6.17 कोटी भरले
दिग्दर्शक दिनेश विजन यांनी घेतलेले अपार्टमेंट हे 9000 स्क्वेअर फूटमध्ये बांधल्या गेले आहे. पाली हिल मुंबईच्या नरगिस दत्त रोड वर रुस्तमजीच्या पारिशराम बिल्डिंग मध्ये हे अपार्टमेंट 15 आणि 16 व्या माळ्यावर बांधण्यात आले आहे. हे अपार्टमेंट 25 जुलै रोजी रजिस्टर केल्या गेले आहे. यासाठी दिनेश यांनी 6.17 कोटी रुपये एवढी या फ्लॅटची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.
शहरांमध्ये आलिशान घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक शहरांमध्ये प्रॉपर्टीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तरी सुध्दा महागडी घरे खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतोय. यात चित्रपट सृष्टीमध्ये कार्य करणाऱ्या आणि उद्योजक वर्गाचा सहभाग जास्त आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            