Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Opening Bell: भांडवली बाजार तेजीत! सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला; अदानी ग्रीन, IDFC First bank चा भाव वाढला

सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवार) भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात तेजीत झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी वधारून 61,465 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 59 अंकांनी वधारून 18,124 वर ट्रेड करत आहे. टाटा स्टील, अदानी टोटल गॅस, वरुण बिव्हिरेजेस, अंबुजा सिमेंट या कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

Read More

Market Opening Bell: भांडवली बाजार किंचित वधारला; तिमाही निकालानंतर बजाज फायनान्सचा शेअर तेजीत

भारतीय भांडवली बाजारात सकाळी किंचित वाढ पाहायला मिळाली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाची आकडेवारी जाहीर होत असून त्याचा परिणाम प्रमुख निर्देशांकावर दिसून येत आहे. बजाज फायनान्स आणि मारुती सुझुकीच्या तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम बाजारावर झाला. आज रिअल इस्टेट, ऑटो कंपन्यांच्या शेअर्सला मोठी मागणी आहे.

Read More

Market opening Bell: भांडवली बाजारात मरगळ! निफ्टी, सेन्सेक्स खाली; इंडसंड बँकेचा शेअर वधारला

भारतीय भांडवली बाजारात काल सकारात्मक वातावरण होते. मात्र, आता पुन्हा बाजारात मरगळ आली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक किंचित खाली आले. कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असताना बाजार दोलनामय स्थितीत आहे. चालू आठवड्यात अमेरिकेच्या जीडीपी आणि महागाईची आकडेवारी जाहीर होईल, त्याचा शेअर मार्केटवर परिणाम होऊ शकतो.

Read More

Market Opening Bell: भांडवली बाजारात तेजी! सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला; रिलायन्स, ICICI बँकचे शेअर्स तेजीत

आज (सोमवार) सकाळी भांडवली बाजार तेजीत सुरू झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 40 अंकांची वाढ होऊन 17624.05 वर ट्रेड करत आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 120 अंकांनी वाढून 59655.06 वर ट्रेड करत आहे. आज इंडसंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, परसिस्टंट सिस्टिमसह इतरही काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील. या कंपन्यांच्या निकालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Market Opening Bell: भांडवली बाजाराची सकारात्मक सुरुवात; तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्केट दोलायमान स्थितीत

भारतामध्ये सध्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाचा हंगाम सुरू आहे. तसेच जागतिक स्तरावरील एकंदर परिस्थितीमुळे भांडवली बाजार स्थिर नाही. आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. मात्र, बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होताच निर्देशांकात मोठी हालचाल दिसून येते. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

Market opening Bell: भांडवली बाजारात चढउतार! सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक वधारुन पुन्हा कोसळले

आज सकाळी भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वरती गेले. मात्र, काही वेळातच बाजार पुन्हा खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टी सकाळी 10:15 च्या सुमारास लाल रंगात ट्रेड करत होते. दरम्यान, बँक निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली.

Read More

Market Opening Bell: शेअर्स मार्केट तेजीत! कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालावर गुंतवणूकदारांचे लक्ष

कॉर्पोरेट कंपन्यांचे आज (बुधवार) तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली बाजारात तेजी दिसून येत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. दरम्यान, आशियाई देशातील शेअर बाजार संथ गतीने सुरू आहेत. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारावर परिणाम होऊ शकते. टीसीएससह अनेक कॉर्पोरेट कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

Read More

Market Opening Bell: सेन्सेक्स 60 हजार अंकांच्याही पुढे, जागतिक मार्केटच्या तुलनेत भारतीय बाजार सुस्थितीत

भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सलग सहा दिवस शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत असून प्रगती दर्शवत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर वरती गेले. सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीही वधारला आहे. उद्यापासून कंपन्यांचे तिमाहीचे निकाल जाहीर होतील. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसत आहे.

Read More

Market Opening Bell: तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजारात किंचित वाढ; Q4 च्या निकालाकडे गुंतवणुकदारांचे लक्ष

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित वाढ झाली. या आठवड्यात चौथ्या तिमाहातील निकाल जाहीर होणार आहेत. तसेच भाववाढीचा डेटा आणि अमेरिकेतील चौथ्या तिमाहीचे निकालही जाहीर होणार आहेत. या घडामोडींच्या पाश्वभूमीवर शेअर बाजारात मोठी हालचाल दिसू शकते. गुंतवणूकदारांनी आज सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

Read More

Market Opening Bell: शेअर मार्केट सुरू होताच निफ्टी, सेन्सेक्स आपटले; आरबीआय पतधोरणाकडे सर्वांचे लक्ष

मागील चार दिवसांपासून शेअर बाजार सतत वर जात होता. मात्र, आज सकाळी शेअर मार्केट उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्स आपटले. बँक निफ्टी निर्देशांकही 130 अंकांनी खाली आला. आज आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे, त्याचा परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला. जर दरवाढ झाली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊ शकतो. तसेच चौथ्या तिमाहीच्या निकालाचाही शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.

Read More