Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Opening Bell: सेन्सेक्स 60 हजार अंकांच्याही पुढे, जागतिक मार्केटच्या तुलनेत भारतीय बाजार सुस्थितीत

Market Opening Bell

भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सलग सहा दिवस शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत असून प्रगती दर्शवत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर वरती गेले. सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीही वधारला आहे. उद्यापासून कंपन्यांचे तिमाहीचे निकाल जाहीर होतील. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसत आहे.

Market Opening Bell: आज (मंगळवार) भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सलग सहा दिवस शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत असून प्रगती दर्शवत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर वरती गेले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 80 अंकांनी वधारून 17704 वर पोहचला आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक 60 हजारांच्या टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. 167 अंकांच्या वाढीसह निफ्टी 60014 अंकांवर ट्रेड करत आहे.

बँक निफ्टी निर्देशांकही वर गेला आहे. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वात वरती गेले आहेत. सार्वजनिक बँकांचा PSU निफ्टीसुद्धा प्रगती करत आहे. बाँडमधून मिळणारा परतावाही वाढला आहे. अमेरिका आणि देशी गुंतवणुकदार बाँडमधील परतावा काढून घेत आहेत.

कोणते शेअर्स चर्चेत?

निफ्टी निर्देशांकातील कोटक बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, एसबीआय लाइफ, पंजाब नॅशनल बँक, अदानी एंटरप्राइजेस आणि सन फार्मा कंपनीचे शेअर्स वरती गेले आहेत. यातील कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 4.41 टक्क्यांनी वरती गेला आहे. तर ग्रासीम, टीसीएस, एशियन पेंट्स, एचडीएफ कंपन्यांचे शेअर्सचे भाव खाली आले आहेत.

उद्यापासून (बुधवार) कॉर्पोरेट कंपन्या चौथ्या तिमाहीतील निकाल जाहीर करणार आहेत. त्याचे सकारात्मक पडसाद आजपासून बाजारात दिसून येत आहेत. जर कॉर्पोरेट कंपन्यांचे निकाल चांगले आले तर बाजारात मोठी उलाढाल दिसू शकते. दरम्यान, जागतिक शेअर बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजार चांगल्या स्थितीत आहे. अमेरिका युरोपमधील बाजार रेंगाळले आहेत.

क्रिप्टोकरन्सी दहा महिन्याच्या उच्चांकावर

क्रिप्टोकरन्सीचे दर 10 महिन्याच्या उच्चांकीवर पोहोचले आहेत. मागील काही महिन्यांपासून क्रिप्टोचे दर खाली आले होते. जागतिक मंदीच्या स्थितीमुळे ट्रेडिंगही कमी झाली होती. मात्र, आता सकारात्मक बदल दिसून येत आहेत. अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवणार नाही, असा विश्वास गुंतवणुकदारांना वाटत आहे. त्यामुळे प्रमुख क्रिप्टो करन्सीजने 30 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत रोजगाराची आकडेवारीही चांगली दिसत आहे. कंपन्यांकडून नोकरभरती करण्यात येत असल्याने परिस्थिती सुधारत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम क्रिप्टोकरन्सी आणि भांडवली बाजारावर दिसून येत आहे.

दरम्यान, भाववाढीची तिमाही आकडेवारीही लवकरच जाहीर होणार आहे. भारतामध्ये आरबीआयने सध्या व्याजदर वाढीला ब्रेक लावला असला तरी महागाई नियंत्रणात नाही. याचा परिणाम गुंतवणुकदारांच्या निर्णयावर होऊ शकतो. अमेरिकेतील महागाईची आकडेवारीही याच महिन्यात जाहीर होणार आहे. जर महागाई नियंत्रणात आली नाही तर दरवाढ होऊ शकते.