Market Opening Bell: भारतीय भांडवली बाजाराची सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही प्रमुख निर्देशांक वधारले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 40 अंकांची वाढ होऊन 17624.05 वर ट्रेड करत आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 120 अंकांनी वाढून 59655.06 वर ट्रेड करत आहे. बँक निफ्टी 43500 अंकांच्या पुढे ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने मागील आठवड्यात (शुक्रवार) तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीला मागील वर्षीच्या तुलनेत 19% नफा झाल्याने आज रिलायन्सचा भाव वाढला आहे. 1 टक्क्यांनी भाव वाढून 2371.45 वर RIL शेअर ट्रेड करत आहे.
आज कोणत्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार?
इंडसंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील परसिस्टंट सिस्टिमसह इतरही काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील. या निकालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या शेअर्सचे भाव वाढले, कोणते खाली आले?
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय, विप्रो, बँक ऑफ महाराष्ट्र, Ircon International Ltd या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. तर येस बँक, व्होडाफोन, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, रेल विकास निगम या कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहेत.
शेअर बाजारात तेजी येण्यामागील तीन कारणे
भांडवली बाजार तेजीत येण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ICICI बँकेने तिमाही निकालात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बँक निप्टी तेजीत आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने अपेक्षेपेक्षा जास्त नफ्याची नोंद केली. तिसरे म्हणजे, HDFC आणि HDFC बँकेचे एकत्रीकरण करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली. या तिन्ही घटनांचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. दरम्यान, रुपया डॉलरच्या तुलनेत 2 पैशांनी खाली आला. दरम्यान, व्याजदर वाढीच्या भीतीमुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किंमती खाली आल्या आहेत. ब्रेंड क्रूड 48 सेंट्सनी खाली आले आहे.