Market Opening Bell: सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवार) भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात तेजीत झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी वधारून 61,465 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 59 अंकांनी वधारून 18,124 वर ट्रेड करत आहे. बँक आणि आयटी निफ्टीमध्येही तेजी दिसून येत आहे.
टॉप गेनर्स आणि लूझर्स
मार्केट सुरू होताच अदानी ग्रीन, आयडीएफसी फर्स्ट बँक, युपीएल, आयशर मोटर्स, हिंदाल्को, एसबीआय लाइफ, ओनजीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर हिरो मोटो कॉर्प, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स आणि सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्स खाली आले.

सौजन्य - गुगल
HSBC कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. कंपनीच्या नफ्यात 212% टक्के वाढ झाली. जगभरात व्याजदर वाढ होत असल्याचा फायदा बँकेला झाला. एप्रिल महिन्यात भारतीय शेअर बाजाराने संपूर्ण आशियाई देशातील भांडवली बाजारांना मागे टाकले. एप्रिल महिन्यात परदेशी गुंतवणुकदारांनी भारतात गुंतवणूक वाढवल्याने भारतीय बाजाराला फायदा झाला.
एनडीटीव्हीच्या नफ्यात मोठी घट
न्यू दिल्ली टेलिव्हिजन नेटवर्क म्हणजे NDTV या आघाडीच्या न्यूज चॅनलला तिमाही निकालात मोठा तोटा झाला. 97.6% टक्क्यांनी नफा कमी झाला. अदानी समूहाने एनडीटीव्ही विकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच तिमाही निकाल हाती आले. अदानी समूहाने एनडीटीव्ही विकत घेतल्यानंतर चॅनलवरील जाहिरातींचा ओघ कमी झाल्याने उत्पन्न घटले. तिमाही निकालानंतर कंपनीचे शेअर्स आणखी खाली आले आहेत.
टाटा स्टील, अदानी टोटल गॅस, वरुन बिव्हिरेजेस, अंबुजा सिमेंट आणि तरही काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. या निकालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            