Market opening Bell: भारतीय भांडवली बाजारात काल (सोमवार) पडझड पाहायला मिळाल्यानंतर आज सकाळी मार्केट थोड्या काळासाठी सावरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी वधारून 60 हजार अंकांच्या पुढे गेला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,750 च्या जवळ आला. मात्र, सकाळी बाजारा सुरू झाल्यानंतरची ही प्रगती अल्पकाळ टिकली. त्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काल इन्फोसिस कंपनीचे शेअर्स ढासळले होते. मात्र, आज शेअर्सने तोटा भरून काढला. इन्फोसिसचा शेअर हिरव्या रंगात ट्रेड करत असून शेअर्सची किंमत 1266.20 ज्या सुमारास आहे.
Bank Nifty निर्देशांक 42350 अंकांवर गेला असून बँकांचे शेअर्स तेजीत आहेत. काल दिवसभर अमेरिका आणि युरोपातील प्रमुख बाजार तेजीत होते. मात्र, भारतीय बाजार दिवसभर लाल रंगात ट्रेड करत होता. आज सकाळी बाजार सुरू होताच जस्ट डायल कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले. तर टाटा केमिकल्सचे शेअर्स 4 टक्क्यांनी खाली येऊन 949.75 वर ट्रेड करत आहे. ब्रोकर कंपनी एंजल वन कंपनीने 30 टक्के नफा वृद्धी नोंदवल्यानंतर कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी वर जाऊन 1327.20 वर ट्रेड करत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी खाली आला.
सकाळच्या सत्रातील टॉप गेनर्स
येस बँक, बँक ऑफ बडोदा, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इन्फोसिस, टाटा स्टील आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले.
अदानी कंपनीचे कर्ज मागील एक वर्षात 21 टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त काल ब्लूमबर्ग या वृत्तवाहीनीने दिले आहे. याचा बातमीचा परिणाम अदानी ग्रुप कंपनीच्या शेअर्सवर होऊ शकतो. अदानी समुहाने अनेक आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज घेतले आहे. अदीनाच्या एकूण कर्जापैकी 29% कर्ज हे परदेशी बँकांकडून घेतलेले आहे. हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर कंपनीने कर्ज चुकते करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.