Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farming Idea: कोरडवाहू शेतात घेतले जाते डाळिंबाचे भरघोस पिक, वर्षाला लाखोंचा नफा

Pomegranate Cultivation: सांगली जिल्ह्यातील पात्रेवाडी हे 2200 ते 2300 लोकवस्ती असलेलं गाव. प्रचंड दुष्काळाने ग्रस्त असलेल्या या गावात अनेकदा शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र यामधूनही मार्ग काढून शेतकऱ्यांनी यशस्वीपणे डाळिंबाची बाग फुलवून दाखवली. आज या गावातील जवळपास 70% शेतकरी डाळिंबाचे उत्पन्न घेऊन आनंदाने जीवन जगत आहे.

Read More

Farming Idea: काशीभोपळा! कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक

Pumpkin Vegetable: नागपूर जिल्ह्यातील शेतकरी तुकाराम रेळेकर हे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या शेतात काशीभोपळ्याचं पिक घेतात. कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक अशी ओळख या पिकाची आहे. तुकाराम हे वर्षाला दोन ते तीन वेळा हे पिक घेतात. यामाध्यमातून त्यांना बऱ्याचदा दुप्पट नफा मिळतो.

Read More

Muskmelon Farming: खरबूज फळाची शेती करणे नफ्याचे की तोट्याचे? लागवड कशी करावी?

Muskmelon Farming: फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा सुरु होताच आपल्याला शरीराला गारवा देणारी फळे खावीशी वाटतात. यामध्ये टरबूज आणि खरबूज या फळांचा प्रामुख्याने समावेश होतो. नांदेड जिल्ह्यातील नवनाथ देशमुख हे गेल्या दहा वर्षांपासुन यशस्वीपणे खरबूजची शेती करीत आहेत. केवळ पारंपारिक पद्धतीने शेती न करता, अभ्यासपूर्ण शेती केल्यास चांगला नफा मिळतो, ही गोष्ट शेतकरी नवनाथ देशमुख यांनी सिद्ध करुन दाखवली.

Read More

Village of Fruits in Satara: साताऱ्यातील छोटंस खेडेगाव महाराष्ट्रात चमकलं; 'फळांच गाव' म्हणून धुमाळवाडीचा गौरव

जेमतेम बाराशे लोकसंख्या असलेल्या धुमाळवाडीनं फळशेतीचा आदर्श घालून दिला आहे. गावामध्ये 19 पेक्षा जास्त फळांची यशस्वी लागवड केली जाते. छोट्याशा गावाची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त आहे. 'फळांचं गावं' कसं नावारुपाला आलं वाचा.

Read More

Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रूटची शेती फायद्याची की तोट्याची? जाणून घ्या काय सांगतात युवा शेतकरी प्रणय बारापात्रे

Dragon Fruit Farming: गेल्या दोन महिन्यांपासून ड्रॅगन फ्रूटचे दर वाढले आहेत. यामागे मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे कारण दिसून येत आहे. परंतु, यामध्ये शेतकऱ्यांना आता जो नफा होतो आहे किंवा कोरोना काळात ज्याप्रमाणे नफा झाला, तेच सातत्य पुढे भविष्यात देखील कायम राहील का? एकंदर नफा बघून उमेदीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करावी का? हा खरा प्रश्न.

Read More

Cultivation of Asafoetida : हिंगाची लागवड कशी करावी? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cultivation of Asafoetida : हिंग हा मसाल्याचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या अनेक समस्यांवर सुद्धा हिंग औषध म्हणून काम करते. हिंगाची लागवड भारतात दुर्मिळ मानली जाते. चला तर मग जाणून घेऊयात हिंगाची लागवड कशी करायची? त्यातून किती नफा मिळू शकतो?

Read More

Sweet Corn Farming : स्वीट कॉर्न ठरतंय जास्तीचा नफा देणारे पीक; जाणून घ्या कशी करावी लागवड ?

Sweet Corn Farming : पावसाळा सुरू होताच प्रत्येकाला मक्याचे गरम कणीस खायची इच्छा होते. त्यामुळेच या दिवसात कणसांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. शिवाय मागणी वाढल्यामुळे कणसांना चांगला भावही मिळतो. शेतकऱ्यांसाठी मका हे चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे. त्याच दृष्टीने जाणून घेऊया, स्वीट कॉर्न लागवड कशी केली जाते?

Read More

Digital Farming : डिजिटल शेती म्हणजे काय? त्यातून शेतकऱ्यांना कशी मदत होईल? जाणून घ्या

Digital Farming : भारत सरकारने देशातील कृषि क्षेत्र वाढवण्यासाठी Digital Agriculture and AI ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही डिजिटल शेती काय आहे आणि शेतकरी AI च्या मदतीने शेती कशी करता येऊ शकते? जाणून घेऊया

Read More

Cardamom Farming : वेलची लागवड कशी केली जाते? किती उत्पन्न मिळू शकते? जाणून घ्या

Cardamom Farming : प्रत्येक शेतीचे काही न काही वैशिष्टे असते. त्याचबरोबर पीक लागवड पद्धतीदेखील वेगळीच असते. शेतकरी बांधवांनी वेलची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. जाणून घेऊया, वेलची लागवड कशी करावी?

Read More

Rainy Season Agricultural crops : फक्त भातच नाही तर पावसाळ्यात 'या' पिकांची शेतीही मिळवून देऊ शकते भरभरून उत्पन्न

Rainy Season Agricultural crops : पावसाळा सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत देशातील बहुतांश शेतकरी भातशेतीमध्ये गुंतले आहेत. असे अनेक शेतकरी आहेत जे पारंपारिक शेतीपासून दूर गेले आणि अधिक नफा मिळविण्यासाठी विविध प्रकारची शेती करतात. जाणून घेऊया, त्या पिकांबद्दल ज्यांची लागवड तुम्ही पावसाळ्यात अगदी आरामात करू शकता. त्याचबरोबर या पिकांच्या लागवडीतून तुम्हाला बंपर नफाही मिळू शकतो.

Read More

Climate Smart Farming : 'क्लायमेट स्मार्ट शेती' उपक्रमाच्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, जाणून घ्या

Climate Smart Farming : "क्लायमेट स्मार्ट शेती' हा उपक्रम राबवून शेतीसाठी अनेक तंत्र विकसित केले जाते. हा उपक्रम आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे हा आहे. जाणून घेऊया, क्लायमेट स्मार्ट शेती उपक्रमाबाबत आधिक माहिती.

Read More

Sandalwood Plantation : चंदनाची लागवड करून मिळवू शकता भरघोस नफा, जाणून घ्या लागवडीसाठी किती येणार खर्च?

Sandalwood Plantation : शेतकरी आपले संपूर्ण आयुष्य शेतात घालवतो, त्यानंतरही तो चांगला पैसा कमवू शकत नाही. त्यामुळेच आता बहुतांश शेतकरी पारंपरिक शेतीपासून दूर जाऊन काहीतरी वेगळे करत आहेत. तुम्हालाही काही वेगळे करायचे असेल तर ही आयडिया तुमच्यासाठी.

Read More