Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swaminathan Commission : शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कोणत्या होत्या?

शेतीचे घटते उत्पन्न, शेतकऱ्यांचा घसरत चाललेला आर्थिक स्तर आणि यातून कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही सर्व परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 18 नोव्हेंबर 2004 मध्ये स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. त्यानंतर 2006 मध्ये आयोगाने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. त्यामध्ये शेतीच्या उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध शिफारशी करण्यात आल्या आह

Read More

Ginger Price Hike : अद्रकाचा दर किलोला 220 रुपये; ऐन पावसाळ्यात अद्रकाचा चहा झाला महाग

स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्यात जमा असताना आता अद्रकाच्या दरवाढीने नागरिकांना झटका दिला आहे. अद्रकाचे भाव किलोला 220 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सर्वसामान्यांना अद्रकाच्या चहाच्या चवीला मुकावे लागत आहे. इतकेच नाही तर कोल्हापुरात चहाच्या टपरीवर अद्रकाच्या चहाचे दर 4 ते 5 रुपयांनी वाढवले आहेत.

Read More

Millets Crop : खरीप हंगामात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात भरडधान्य पिके

संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचे (Millets Crop) उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. शिवाय हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. ही पिके सहज वाढतात, हवामानास अनुकूल आणि दुष्काळ प्रतिरोधक असतात. त्यामुळे ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला नक्कीच चालना देणारी ठरू शकतात.

Read More

Nano urea : नॅनो युरियाच्या वापराने पिकांच्या उत्पादन खर्चात होईल बचत

नॅनो युरिया हे द्रव्य स्वरुपात उपलब्ध होणारे खत आहे. हे पिकातील नायट्रोजनची गरज प्रभावीपणे पूर्ण करते, पानांचे प्रकाश संश्लेषण आणि झाडाच्या वाढीस मदत करते. याच्या उच्च कार्यक्षमतेमुळे पारंपारिक म्हणजे दाणेदार युरियाची आवश्यकता 50% किंवा त्याहून अधिक कमी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते.

Read More

Agricultural News : शेतातील उत्पन्न वाढण्यासाठी 'ब्रॉड बेड मेथड' कशी उपयुक्त असू शकते? जाणून घ्या

Broad bed method : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणी सुरू होते. सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रगत पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येईल. सोयबिनची पेरणी करण्यासाठी ब्रॉड बेड मेथड कशी उपयुक्त आहे? त्यापासून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते का? जाणून घेऊया.

Read More

Bamboo Farming : पडीक जमिनीत करा बांबू लागवड; मिळवा उसापेक्षा जास्त उत्पन्न

ऊस लागवडीमधून हेक्टरी उत्पादन किमान 100 टन आणि भाव प्रति टन किमान 2500 मिळतो. मात्र, बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन हे 100 टनापर्यंत मिळते आणि बांबूला मिळणारा भाव हा प्रति टन किमान 4000 रुपयांपर्यत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बांबू पिकाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

Read More

Monsoon Effect : मान्सूनच्या विलंबाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसणार फटका

राज्याच्या आर्थिक वृद्धीमध्ये शेती क्षेत्राचा 12 % वाटा आहे. राज्यात आज घडीला 166108 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र मान्सूनला विलंब होत असल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा राज्याचा कृषी क्षेत्रातील वृद्धी दर हा 10.2 % अपेक्षित होता. मात्र, कृषी उत्पादनावर परिणाम झाल्यास राज्याच्या अर्थकारणालाही फटका बसणार आहे.

Read More

Subsidy on Cotton Seeds: पंजाबमधील शेतीचा पॅटर्न बदलणार, राज्य सरकार कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देणार

Subsidy on Cotton Seeds: राज्यात भूजल पातळी कमी झाली आहे. तसेच भाताच्या पिकाला आवश्यक पाणी उपलब्ध नाही. याचा परीणाम थेट उत्पादनावर झाला आहे . सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की राज्यात कापसाच्या शेतीला प्रोत्साहन दिले जाईल व उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन केले जाईल यासाठी इतर पिकांची शेतकऱ्यांनी लागवड करणे गरजेचे आहे म्हणून कापूस बियणांवर सरकार शेतकऱ्यांना 33% अनुदान देणार आहे.

Read More

Wheat Prices in India: गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Wheat Prices in India: सरकारने गव्हाचे भाव कमी करण्याऐवजी खुल्या बाजारातून (Open Market) गव्हाची खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळेल. MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत, पण सरकारला जास्तीत जास्त किमतीत गव्हाची विक्री करायची आहे आणि तरीही ही किंमत MSP च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करणारा ठरला आहे.

Read More

Union Budget 2023: कृषि स्टार्टअप्सला सरकार देईल प्रोत्साहन; अर्थसंकल्पात 20 लाख कोटींची तरतूद

अर्थसंकल्प 2023-24'च्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे, अर्थमंत्री सीतारामन यांनी कृषि क्षेत्राबाबत सरकारच्या काही महत्वपूर्ण निर्णयांबद्दल माहिती सुरुवातीलाच दिली आहे. केंद्र सरकारने कृषि स्टार्टअप्स (Agri Startups) संदर्भात अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे.

Read More

Organic farming: जाणून घ्या, 'नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग' या उपक्रमाबद्दल..

Organic farming: 'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले.

Read More

Agri Sector Production: लहरी हवामानामुळे कृषी उत्पन्नाला फटका, गहू, तांदळाचे उत्पादन घटले

मागील वर्षभरात लहरी हवामानाचा फटका तांदूळ आणि गहू या पिकांच्या उत्पादनाला बसला. दुष्काळी परिस्थिती आणि उष्णतेच्या लाटेमुळे गहू आणि तांदळाचे उत्पादन कमी झाले.

Read More