Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Organic farming: जाणून घ्या, 'नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग' या उपक्रमाबद्दल..

Organic farming

Image Source : http://www.thestatesman.com/

Organic farming: 'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले.

Organic farming: नैसर्गिक शेती (Natural farming) ही एक विष मुक्त शेती प्रणाली आहे जी पर्यावरणशास्त्र, रिसोर्स रिसायकलिंग (Resource recycling) आणि ऑन-फार्म रिसोर्स ऑप्टिमायझेशनच्या आधुनिक समजाने समृद्ध आहे. ही शेती पर्यावरणावर आधारित वैविध्यपूर्ण शेती प्रणाली मानली जाते जी पिके, झाडे आणि पशुधन यांना कार्यात्मक जैवविविधतेसह एकत्रित करते. प्रामुख्याने ऑन-फार्म बायोमास रिसायकलिंगवर (On-farm biomass recycling) आधारित आहे, ज्यामध्ये बायोमास मल्चिंग, ऑन-फार्म शेणखत फॉर्म्युलेशनचा वापर यावर भर दिला जातो. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचे कामही यातून केले जाते.  

नैसर्गिक शेती आनंदी गाव….. 

'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार (Central Government and State Government) यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी आणि शेती या दोघांमधील दुवा बनण्याचे काम या उपक्रमातून केले जाते त्याचबरोबर या साठी पोर्टल सुद्धा लॉंच करण्यात आले आहे. 

नैसर्गिक शेतीचे फायदे (Advantages of natural farming)

मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणे, विविधता राखणे, प्राण्यांचे कल्याण सुनिश्चित करणे, नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षम वापरावर भर देणे आणि पर्यावरणीय निष्पक्षतेला प्रोत्साहन देणे हे नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक शेती हा एक पर्यावरणीय कृषी दृष्टिकोन आहे जिथे कृषी प्रणाली नैसर्गिक जैवविविधतेसह कार्य करते. मातीच्या जैविक क्रियाकलापांना उत्तेजित करते आणि अन्न उत्पादन प्रणालीची जटिलता तसेच वनस्पती आणि प्राणी या दोन्ही सजीवांचे व्यवस्थापन करते.

नैसर्गिक शेती खालील उद्देश पूर्ण करते.. (Natural farming serves the following purposes)

  • उत्पन्नात सुधारणा करते 
  • चांगले आरोग्य सुनिश्चित करते 
  • पर्यावरण संरक्षण करते 
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते 
  • रोजगार निर्मिती होते 
  • पाण्याचा वापर कमी होतो
  • किमान उत्पादन खर्च

कमी खर्चात भरपूर उत्पन्न….. (A lot of income at a low cost…..)

नैसर्गिक शेती उद्देश तर पूर्ण करतेच पण त्यासोबतच आर्थिक बाजू सुद्धा भक्कम करण्यास मदत करते. रासायनिक शेती सुद्धा भरपूर उत्पन्न देऊ शकते परंतु मागील 2 वर्षात कोरोनामुळे झालेले नुकसान कधीच भरून निघण्या जोगे नाही. रासायनिक अन्न पदार्थ सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आता लोकांचा कल नैसर्गिक बाबींकडे जास्त दिसून येत आहे. आरोग्य हीच संपत्ती असा विचार करून आता सर्वत्र नैसर्गिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. नैसर्गिकता टिकवून ठेवल्याने नैसर्गिक शेती आनंदी गाव हा उपक्रम अधिक भरारी घेईल.