Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wheat Prices in India: गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Wheat Prices in India

Wheat Prices in India: सरकारने गव्हाचे भाव कमी करण्याऐवजी खुल्या बाजारातून (Open Market) गव्हाची खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळेल. MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत, पण सरकारला जास्तीत जास्त किमतीत गव्हाची विक्री करायची आहे आणि तरीही ही किंमत MSP च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करणारा ठरला आहे.

गहू हे देशातील प्रमुख रब्बी पीक आहे आणि प्रत्येकासाठी, केवळ ग्राहकच नाही, तर शेतकरी आणि सरकारसाठी देखील  गव्हाचे उत्पादन, त्याची किंमत आणि संबंधित हवामानाच्या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. 2021-22 मध्ये देशांतर्गत गव्हाच्या उत्पादनात झालेली घट, युक्रेन- रशिया युद्ध आणि इतर काही मूलभूत कारणांमुळे गव्हाच्या किमती 3000 रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचल्या आणि बऱ्याच कालावधीसाठी ही स्थिती बघायला मिळाली. साधारणपणे 2,000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली विकल्या जाणाऱ्या गव्हाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत, यामुळे शेतकरी चांगला नफा कमावत आहेत आणि पीक कालावधी 2022-23 मध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.

सरकारच्या उपाययोजनेमुळे वाढले गव्हाचे भाव (Wheat prices increased due to government measures)  

गेल्या वर्षी प्रथमच जेव्हा काही मूलभूत कारणांमुळे गहू पिकाचे भाव वाढू लागले तेव्हा प्रथम सरकारने गव्हाच्यानिर्यातीवर बंदी घातली आणि भाव वाढणे यामुळे थांबले नाही तेव्हा भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) साठ्याची विक्री सुरू झाली. केले. पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला भाव मिळत होता, मात्र सरकारच्या काही निर्णयांमुळे अखेर गव्हाचा भाव सुमारे 1000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे

शेतकऱ्यांकडून सरकारने करावी गव्हाची खरेदी (Government should buy wheat from farmers)

मोफत अन्नधान्य वितरित करण्यासाठी आणि देशाची अन्न सुरक्षा सुस्थितित आणण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करावा अशी अपेक्षा आहे. नियमांनुसार, FCI कडे 1 एप्रिलपर्यंत किमान 74 लाख टन गहू आणि 1 जुलैपर्यंत किमान 275 लाख टन गहू असणे आवश्यक आहे. परंतु गेल्या वर्ष 2021-22 मध्ये, गव्हाच्या किमती MSP पेक्षा जास्त असल्यामुळे, सरकारच्या 433 लाख टन लक्ष्याच्या तुलनेत केवळ 188 लाख टन गहू खरेदी करता आला, जो लक्ष्याच्या 56.6% होता. परिणामी, सध्या स्थिती अशी आहे की एफसीआयच्या गोदामांमध्ये 126 लाख टन गहू शिल्लक आहे, जो 1 एप्रिलपर्यंत 95 लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2017 पासून आतापर्यंतचा हा FCI चा सर्वात कमी साठा आहे. सरकारी खरेदी साधारणपणे एप्रिलपासून सुरू होते आणि सुमारे 4 महिने चालते. चालू हंगामासाठी सरकारने गव्हाचा एमएसपी २१२५ रुपये प्रति क्विंटल ठेवला आहे, परंतु मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लवकर पेरणी केलेल्या गव्हाची आवक नुकतीच मंडईत सुरू झाली असून,त्याचा भाव २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

‘तर’ गहू उत्पादनावर होईल परिणाम ('Then' wheat production will be affected)

परंतु काही तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत की पुढील 3-4 आठवड्यांत सरासरीपेक्षा जास्त तापमान, जेव्हा गहू काढणीसाठी उपयुक्त असेल, तेव्हा अंतिम उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये, सरकारचा अंदाज आहे की गव्हाचे उत्पादन 1121.8 लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, जे 2020-21 मध्ये 1095.9 लाख टनांवर पोहोचल्यानंतर 2021-22 च्या मागील हंगामात 1068.4 लाख टनांपर्यंत घसरले होते. मध्य प्रदेशात मार्चच्या मध्यापर्यंत गव्हाची कापणी सुरू होते आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये एप्रिलमध्ये. गहू खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पीक मंडईत पोहोचण्यापूर्वी किमान किंमती कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी FCI ने नुकतीच खुल्या बाजारात 15 मार्चपर्यंत होणाऱ्या ई-लिलावात गव्हाची राखीव किंमत 200 रुपयांनी कमी करून 2150 रुपये प्रति क्विंटल केली आहे.