Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Drones manufacturing : भारत बनणार जागतिक ड्रोन हब? सरकारनं दिलं 30 कोटी रुपयांचं अनुदान

Drone manufacturing : नागरी उड्डाण मंत्रालयानं ड्रोन आणि ड्रोन घटकांच्या निर्मितीसाठी भरीव रक्कम देऊ केली आहे. पीएलआय (Production Linked Incentive Scheme) योजनेच्या अंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात 23 लाभार्थ्यांना जवळपास 30 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यासंबंधीचं एक निवेदन काढण्यात आलं. त्यात ही माहिती सविस्तर देण्यात आली आहे.

Read More

Cyber Crime Safety Tips: गुंतवणूक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा; पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करताना अशी काळजी घ्या

Cyber Crime Safety Tips: जर तुम्ही पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य होऊ शकता. नुकतीच पोस्टाने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर सायबर गुन्हेगार लक्ष्य ठेवून आहेत. अशा गुन्हेगारांकडून बचाव कसा करायचा हे जाणून घ्या.

Read More

PPF Update: जाणून घ्या PPF गुंतवणूकदारांसाठी 5 एप्रिल दिवस का आहे विशेष?

PPF Policy : पीपीएफ (PPF) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ही केंद्र सरकारची लोकप्रिय अशी बचत योजना आहे. या योजनेत हमी परताव्या बरोबरच कर सवलतही मिळते. या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत ठरवला जातो. यावेळी एप्रिल ते जून 2023 करीता 7.1 एवढा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

Read More

SSFMS Scheme: 'या' योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडुंना मिळते निवृत्तीवेतन

SSFMS Scheme: युथ अफेअर्स आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून खेळाडुंना पेन्शन स्वरूपात आजीवन आर्थिक साहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या खेळाडुंना एक स्थायी मासिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Read More

MSSC Scheme: भारतातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये ‘महिला सन्मान बचत योजने’चा शुभारंभ; कमी कालावधीत मिळेल उत्तम परतावा

MSSC Scheme: महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत योजने’ची घोषणा करण्यात आली. नुकतेच भारत सरकारने या योजनेचे नोटिफिकेशन जारी केले असून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Read More

SCSS Updates : पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम बदलले, जाणून घ्या तपशील

SCSS Updates : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम अद्ययावत करण्यात आले आहेत. योजना अंतर्गत वाढीव ठेव मर्यादेच्या अधिसूचनेनंतर पोस्ट विभागानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेचा तपशील अपडेट केला आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office)ऑफर केलेल्या अद्ययावत ज्येष्ठ नागरिक बचत खात्याबद्दलचे महत्त्वाचे नियम किंवा मुद्दे माहीत असायलाच हवेत.

Read More

Women Entrepreneurs Policy : महिला उद्योजकांना मिळणार 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान

Women Entrepreneurs Policy : महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. आता महिला उद्योजकांच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेली राज्य शासनाची योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना.

Read More

PM Kisan Yojana: तीन करोडहून अधिक शेतकऱ्यांना घेता आला नाही योजनेचा लाभ!

पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपैकी केवळ 8.69 कोटी लाभार्थी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवू शकले आहेत. 3 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत. डिसेंबर-मार्च 2022-23 दरम्यानचा 13 वा हफ्ता काही आठवड्यांपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आला होता

Read More

Small Savings Schemes : आता लहान मुलांसाठीही आधार सक्तीचं, काय आहेत नवे सरकारी नियम?

लहान बचत योजना आधार प्रमाणीकरण नियम 2023 : लहान बचत योजना आणि आधार कार्डाच्या संदर्भात सरकारनं एक निर्णय घेतलाय. नवी नियमावली जाहीर केलीय. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या नव्या नियमांनुसार विविध बचत योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा असणार आहे. विशेषत: सरकारपुरस्कृत योजनांना आधार अनिवार्य असणार आहे.

Read More

Digilocker : आता डिजिलॉकरद्वारे तुम्ही करु शकता EPFO चे काम, काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

EPFO : दिवसेंदिवस संपूर्ण जग डिजिटायजेशन कडे वळत आहे. आपली सगळी कामे कुठेही बसुन एका क्लिकवर व्हायला पाहीजेत, अशा नागरिकांच्या अपेक्षा असते. हीच बाब लक्षात घेता, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) DigiLocker अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली सुरक्षित ठेवू शकता.

Read More

Subsidy for TAXI: रिक्षा व मालवाहतुकीच्या वाहनांच्या खरेदीवर मिळेल 33% अनुदान, या राज्यात आहे विशेष योजना

Subsidy Scheme for Taxi: ऑटो रिक्षा व मालवाहतुकीच्या गाड्यांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहन खरेदी करताना सामान्यांना दोनदा विचार करावा लागतोय. ही समस्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाहतुकीची वाहने खरेदी केल्यास सरकार 33% अनुदान देणार आहे.

Read More

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : योजनांचा लाभ घ्यायचाय? मग आधार आणि पॅन हवंच!

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड तसंच पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. 31 मार्च 2023ला अर्थ मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं. त्या पार्श्वभूमीवर काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Read More