Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Yojana: तीन करोडहून अधिक शेतकऱ्यांना घेता आला नाही योजनेचा लाभ!

PM Kisan Yojana

पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपैकी केवळ 8.69 कोटी लाभार्थी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवू शकले आहेत. 3 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत. डिसेंबर-मार्च 2022-23 दरम्यानचा 13 वा हफ्ता काही आठवड्यांपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आला होता

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता नुकताच शेतकऱ्यांना मिळाला आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारतर्फे सन्मान निधी पाठवला जातो. परंतु प्राप्त माहितीनुसार नोंदणीकृत 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपैकी केवळ 8.69 कोटी शेतकऱ्यांनाच हा निधी प्राप्त झाला आहे. 3 कोटींहून अधिक शेतकरी, ज्यांनी पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केली होती, ते मात्र या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत. डिसेंबर-मार्च 2022-23 दरम्यानचा 13 वा हफ्ता काही आठवड्यांपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आला होता. 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का दिला गेला नाही यावर सरकारने स्पष्टीकरण देखील दिले आहे.

हे आहे कारण

पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपैकी केवळ 8.69 कोटी लाभार्थी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवू शकले आहेत. नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी सुमारे 3 कोटी शेतकरी दुबार नोंदणी केलेले आणि चुकीची माहिती दिलेले होते. अशा सुमारे 3 कोटी खातेधारकांचे नाव यादीतून काढले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

केवायसी सक्तीची (Mandatory KYC)

लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी अपडेटसाठी सरकारकडून वारंवार विचारणा होत होती. लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती पडताळणी करूनच त्यांना योजनेचा लाभ दिला गेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. या प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांना सरकारला चुकीची अथवा बनावट माहिती सादर केली आहे, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळेच 3.30 कोटींहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत.

किसान सन्मान निधी योजना (KSNY) 

भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी किसान सन्मान निधी योजना (KSNY)  सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्या उत्पन्नाला पूरक साहाय्य देणे आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणे हे आहे. सोबतच शेतकऱ्यांना नाहक कर्जापासून दूर ठेवणे हा देखील या योजनेचा हेतू आहे.

सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजनेद्वारे निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत आहे.

KSNY योजनेसाठी पात्र होण्यासाठी, शेतकऱ्यांनी खालील निकष पूर्ण करणे गरजेचे आहे:

  • शेतकरी हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी.
  • शेतकऱ्याचे वैध बँक खाते असावे.

KSNY योजना ही भारतातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन, या योजनेचे उद्दिष्ट त्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचे कर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जावरील अवलंबित्व कमी करणे आहे.