Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSSC Scheme: भारतातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये ‘महिला सन्मान बचत योजने’चा शुभारंभ; कमी कालावधीत मिळेल उत्तम परतावा

MSSC Scheme

MSSC Scheme: महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत योजने’ची घोषणा करण्यात आली. नुकतेच भारत सरकारने या योजनेचे नोटिफिकेशन जारी केले असून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 एप्रिल 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये खास महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत योजना’(Mahila Sanman Saving Certificate) जाहीर केली. या योजनेंतर्गत महिलांना गुंतवणुकीची सवय लागावी आणि जास्तीत जास्त महिलांनी गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे सामान्य बचत खात्यावरील व्याजदरापेक्षा या योजनेत जास्त व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात.

नुकतेच सरकारकडून या योजनेचे नोटिफिकेशन (Notification) जारी करण्यात आले आहे. सोबतच देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

‘महिला सन्मान बचत योजना’ काय आहे?

महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी म्हणून सरकारने ‘महिला सन्मान बचत योजना’(MSSC) सुरु केली आहे. या योजनेत फक्त महिला गुंतवणूक करू शकतात. ही एक सरकारी योजना असल्याने यातील पैशांची जबाबदारी सरकार घेते. थोडक्यात काय, तर यामध्ये कोणतीही जोखीम नाही.

या योजनेत महिलांना 2 वर्षासाठी (2025 पर्यंत) गुंतवणूक करता येणार आहे. कमीत कमी 1000 रुपये ते कमाल 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकेल. यातील गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याजदर (Interest) देण्यात येत आहे. गुंतवलेल्या रकमेवर मिळालेले व्याजदर तिमाही (Quarterly) स्वरुपात खात्यामध्ये जमा केले जाईल. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट ओपन (MSSC Account Open) करावे लागेल. कोणतीही महिला ‘महिला सन्मान बचत योजना’ खाते ओपन करू शकते आणि त्यामध्ये गुंतवणूक करू शकते.

कर सवलत मिळेल का?

महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक केल्यावर कोणत्याही प्रकारची कर सवलत (Tax Benefit) मिळणार नाही. याशिवाय नियमानुसार व्याजदरातून मिळालेल्या उत्पन्नावर देखील कर (Tax) भरावा लागणार आहे. त्यामुळे कर सवलतीचा विचार करून तुम्ही देखील गुंतवणूक करणार असाल, तर ही योजना तो लाभ करदात्याला देत नाही.

जर महिलांनी या योजनेत 2 लाखाची गुंतवणूक केली, तर त्यावर त्यांना 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. 2 वर्षानंतर त्या महिलेला 2.32 लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसच्या इतर योजनेच्या तुलनेत ही योजना फायद्याची ठरत आहे.

पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) ही देखील गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये कर सवलत मिळवता येते. मात्र याचा लॉक इन पिरीयड 21 वर्षाचा असतो. त्यामुळे कमी वेळेत चांगला परतावा महिलांना हवा असेल, तर महिला सन्मान बचत योजना फायद्याची ठरेल. 

Source: https://bit.ly/3KyjGZw