Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digilocker : आता डिजिलॉकरद्वारे तुम्ही करु शकता EPFO चे काम, काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Digilocker App

EPFO : दिवसेंदिवस संपूर्ण जग डिजिटायजेशन कडे वळत आहे. आपली सगळी कामे कुठेही बसुन एका क्लिकवर व्हायला पाहीजेत, अशा नागरिकांच्या अपेक्षा असते. हीच बाब लक्षात घेता, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) DigiLocker अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली सुरक्षित ठेवू शकता.

Digilocker App : आपण कुठेही जात असलो की आपल्याला आपली सगळी कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतात. ती कागदपत्रे कुठे हरवणार तर नाही ना? ही एक चिंता सतत अपल्या सोबत असते. या सगळ्या गोष्टींवर तोडगा म्हणून भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) DigiLocker अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली सुरक्षित ठेवू शकता. याशिवाय वापरकर्ते डिजीलॉकरवर EPFO ​​सेवा देखील अॅक्सेस करू शकतात. EPFO द्वारे प्रदान केलेले UAN आणि स्कीम प्रमाणपत्र तसेच पेन्शन पेमेंट ऑर्डर देखील डिजिलॉकरमध्ये डाउनलोड केले जाऊ शकतात, काय मग आहे न ही महत्वाची बातमी. भारत सरकारने हे अॅप डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत लाँच केले आहे.

कोणकोणती कागदपत्रे ठेवणार

पॅन कार्ड, कोविड सर्टीफीकेट, दहाव्या वर्गाची मार्कशीट, 12 व्या वर्गाची मार्कशीट, ड्रायविंग लायसेंस, इत्यादी अनेक सर्टीफिकेट ठेवले जातात. हे अॅप यूज करणारे यूजर्स अपना डिजिलॉकर तयार करुन सुरक्षित ठेऊ शकतात. तसेच या  डिजिटल लॉकर वर आपण आपले अकाऊंट बनवुन ठेवु शकतो. डिजिलॉकर वर आपण आपलं अकाऊंट कसे तयार करायचे, ते माहिती करुन घेऊया.

1. सगळ्यात आधी प्ले स्टोर मधुन डिजिलॉकर (Digilocker)अॅप आपले अकाऊंट तयार करण्यासाठी डाउनलोड करा.

2. त्यानंतर त्यामध्ये आपला अधिकृत मोबाईल नंबर टाकुन वेरिफिकेशन करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, ज्याला तुम्हाला इंटर करावे लागेल.

3. डिजिलॉकरवर तुम्हाला तुमचे अकाऊंट उघडण्यासाठी लॉग इन आयडी, यूजरनेम आणि पासवर्ड टाका.

4.त्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर लिंक करा.

5. तुमचं अकाऊंट तयार होताच, तुम्हाला  डॅशबोर्ड पेज दिसुन येईल.

तुम्ही ईपीएफओचा फायदा घेऊ शकता

सर्व यूजर्स डिजीलॉकर वर EPFO चे देखील काम करु शकतात. पेंशन पेमेंट ऑर्डरसह य़ुएएन आणि स्कीम सर्टिफिकेट देखील डाउनलोड करु शकतो. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नाव, जन्म तारीख, पीपीओ नंबर टाकावा लागेल. त्यानंतर डिजिलॉकर मार्फत पीपीओ डॉक्युमेंट डाउनलोड करु शकतो. अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या डिजीलॉकर अॅप द्वारे सर्व सुविधा मिळतील.

डिजिटल इंडियाअंतर्गत निर्मिती

भारत सरकारने डिजिटल इंडियाअंतर्गत आतापर्यंत अनेक अॅपची निर्मिती केलेली आहे. डिजिलॉकर अॅप देखील त्याचाच एक भाग आहे. डिजिलॉकर अॅप अंतर्गत आपण आपली सगळी महत्वाची कागदपत्रे जमा आणि सुरक्षित ठेवु शकतो, त्यामुळे या अॅपला नागरिकांची पसंती राहील हे नक्की.