Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Trading : रात्री देखील ट्रेडिंग करता येणार? NSE ची SEBI कडे मागणी

संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Mirror Trading : मिरर ट्रेडिंग काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

नवीनच शेअर मार्केटमध्ये दाखल झाल्यावर, नेमकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपे जाऊ शकते. पण, अभ्यास न करता चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, तुम्हाला मिरर ट्रेडिंगविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Sensex Crashes: तिमाही निकालातील सुमार कामगिरीमुळे भांडवली बाजार कोसळला; काय आहेत महत्त्वाची कारणे?

बड्या कंपन्यांच्या तिमाही निकालातील निराशाजनक कामगिरीमुळे आज भारतीय भांडवली बाजार कोसळला. इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने निराशाजनक कामगिरी केली. जागतिक घडामोडींचाही बाजारावर परिणाम झाला.

Read More

Share Market: 'या'सरकारी कंपनीने दिलाय जबरदस्त रिटर्न, तीन वर्षात 1 लाखाचे केले पाच लाख!

शेअर मार्केट सगळं रिस्क आणि अभ्यासावर असलं तरी कोणता शेअर कधी उसळी घेईल आणि कोणता खाली येईल हे सांगता येत नाही. अशाच एका सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. त्या कंपनीचे नाव MSTC Ltd (मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड) आहे. ती मेटल स्क्रॅपच्या आयात-निर्यातीच्या कामात आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेवुया.

Read More

Mid cap shares: नफा मिळवून देणारे 3 मिड कॅप शेअर्स, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Mid cap shares: नफा मिळवण्याच्या उद्देशानं मिड कॅप शेअर्स खरेदी करायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देत आहोत. शेअर बाजारात चढ-उतार कायमच होत असतात. जोखीम कमी करण्याच्या हेतूने बाजारातल्या तज्ज्ञांनी निवडलेल्या स्टॉकवर खरेदीची शिफारस करण्यात येते.

Read More

Sankarsh Chanda : शेअर मार्केटचा यंगस्टर बिगबुल, जाणून घ्या 100 कोटींचा मालक संकर्ष चंदा बद्दल

New Big Bull Sankarsh Chanda : शेअर मार्केटमधली अनिश्चितता भल्याभल्यांना घाम फोडते. बुद्धी, चातुर्य, अभ्यास आणि अनुभव या गोष्टींच्या आधारावर पैसे गुंतवतांना कुणी राजा बनतो तर कुणी रंक. मात्र, हैदराबाद येथील 24 वर्षीय मुलाने आपल्या हुशारीने शेअर बाजारात पैसा गुंतवून कोट्यवधी रुपये कमावले आहे.

Read More

Market Opening Bell: भांडवली बाजारात तेजी! सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला; रिलायन्स, ICICI बँकचे शेअर्स तेजीत

आज (सोमवार) सकाळी भांडवली बाजार तेजीत सुरू झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 40 अंकांची वाढ होऊन 17624.05 वर ट्रेड करत आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 120 अंकांनी वाढून 59655.06 वर ट्रेड करत आहे. आज इंडसंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, परसिस्टंट सिस्टिमसह इतरही काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील. या कंपन्यांच्या निकालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजारात पडझड! सेन्सेक्स 520 अंकांनी खाली; IT कंपन्यांचे भाव कोसळले

भारतीय भांडवली बाजारात मागील 9 दिवसांपासून घोडदौड सुरू होती. मात्र, आज (सोमवार) शेअर मार्केट कोसळले. इन्फोसिस कंपनीच्या तिमाही निकालाचा परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून आला. 2020 पासून पहिल्यांदाच IT क्षेत्राचे शेअर्स सर्वाधिक खाली आले आहेत. सेन्सेक्स सुमारे 520 अंकांनी खाली आला. दरम्यान, सार्वजनिक बँकांचे शेअर्स वधारले.

Read More

Market Opening Bell: शेअर मार्केटला उतरती कळा; सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला; अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम

मागील आठ दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती. त्याला आज ब्रेक लागला. गुरुवारी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. अमेरिकन भांडवली बाजार घसरल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी कोसळून 60324 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,777.30 अंकांवर आला आहे.

Read More

Market Closing Bell: शेअर मार्केटमध्ये तेजी! सेन्सेक्स 60 हजारांपार; बँक, मेटल आणि ऑटो कंपन्यांचे भाव वधारले

भारतीय भांडवली बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सलग सहा दिवसांपासून शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत आहे. सेन्सेक्स 300 पेक्षा जास्त अंकांनी वधारला. तर निफ्टी 98 अकांनी वर गेला. उद्या कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आज दिवसभरात मेटल, बँक आणि ऑटो क्षेत्र डिमांडमध्ये राहिले. तर आयटी क्षेत्राचे शेअर्स खाली आले.

Read More

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या IAS-IPS अधिकाऱ्यांसाठी सरकारने जारी केली नियमावली

जे सरकारी अधिकारी स्टॉक, शेअर किंवा इतर गुंतवणुकीत व्यवहार करत असतील तर त्यांना संबंधित विभागांना माहिती देणे अनिवार्य आहे. 6 महिन्यांच्या एकूण मूळ पगारापेक्षा अधिक आर्थिक व्यवहार होत असेल तरच ही माहिती देणे आवश्यक आहे. सादर केलेल्या माहितीत तफावत आढळ्यास संबंधित विभाग त्यांच्यावर कारवाई देखील करू शकते असेही या आदेशात म्हटले आहे.

Read More

Share Market Preview : जगभरातील शेअर बाजारातून सकारात्मक संकेत

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात उसळीने होण्याची अपेक्षा आहे. कारण जगभरातील शेअर बाजारातून येणारे संकेत सकारात्मक आहेत. एसजीएक्स निफ्टी देखील 17700 च्या पातळीच्या जवळ आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 1.2% वर व्यापार करत आहे.

Read More