Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mirror Trading : मिरर ट्रेडिंग काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

Mirror Trading : मिरर ट्रेडिंग काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

Image Source : www.tradefx.co.za

नवीनच शेअर मार्केटमध्ये दाखल झाल्यावर, नेमकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपे जाऊ शकते. पण, अभ्यास न करता चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, तुम्हाला मिरर ट्रेडिंगविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

कोणीही मार्केटमध्ये पैसा डबल होण्यासाठीच गुंतवणूक करतो. त्यासाठी पूर्ण मेहनतीने आणि अभ्यासपूर्ण मार्केट समजून घेवूनच गुंतवणूक करतो. पण, प्रत्येक वेळी फायदा होईलच हे शक्य नसते. कारण, स्टाॅक मार्केटच्या बऱ्याच गोष्टी अशा असतात, त्या नवीन गुंतवणुकदाराला सहजासहजी समजत नाहीत. त्यासाठी मार्केट एक्सपर्टच हवा असतो. तो बनायला खूप वेळ लागतो. पण, तुम्ही डायरेक्ट एक्सपर्टने ज्या ठिकाणी गुंतवणूक केली, त्याच ठिकाणी तुम्ही केली तर. अर्थातच त्याला जर फायदा झाला तर तुम्हालाही होणार आहे. हीच गोष्ट तोटा झाल्यास, लागू होणार आहे. मग याच पद्धतीला मिरर ट्रेडिंग म्हणतात. म्हणजेच कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या ट्रेडिंगच्या धोरणाला काॅपी करू शकतो. सध्या या पद्धतीचा प्रंचड प्रमाणात वापर वाढला आहे.

एक्सपर्ट ट्रेडर कसा निवडायचा?

मार्केटमध्ये ज्या एक्सपर्टला तुम्हाला काॅपी करायचं आहे. त्या एक्सपर्ट ट्रेडरची कामगिरी, रिस्क प्रोफाईल, ट्रेडिंग धोरण या गोष्टी पाहणे गरजेच्या आहेत. त्या बघितल्या नंतर त्या एक्सपर्टने कुठे गुंतवणूक केली आहे हे समजायला मदत होते. त्यानंतर तुम्ही तशा पद्धतीने गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकता.

या ट्रेडिंगचा फायदा काय?

तुम्ही विना रिस्क घेता सहज मार्केटमध्ये उतरू शकता. कारण, एक्सपर्टने केलेली गुंतवणूक सार्वजनिक असते, म्हणजे सर्वांना ती गोष्ट माहिती असते. त्यानुसार अनुभव नसलेली व्यक्ती त्या एक्सपर्टचे अनुसरन करू शकतो. तसेच, या एक्सपर्टचे अनुसरन केल्यामुळे पोर्टफोलिओत विविध असेट्सवर गुंतवणूक करता येते. त्यामुळे रिस्क कमी होऊन, रिटर्न जास्त मिळण्याची शक्यता वाढते. मिरर ट्रेडिंगमुळे कमी अनुभव असलेल्या रिटेल इनव्हेस्टर्सला एक्सपर्टकडून शिकण्याची संधी मिळते. एक्सपर्टने केलेल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवल्यास, त्यांना त्यातून चांगले इनसाईट मिळू शकते. तसेच, त्यांचे धोरण कळू शकते. या गोष्टी रिटेल इनव्हेस्टर्सला मार्केटविषयी समजून घ्यायला मदत करू शकतात.  

तसेच, ज्या रिटेल इनव्हेस्टर्सला अजिबात वेळ नाही, ते या एक्सपर्टचे अनुसरण करून त्यांचा वेळ वाचवू शकतात. कारण, एक्सपर्ट जवळ असलेली निर्णय घेण्याची क्षमता किंवा विश्लेषण हे जबरदस्त असते. त्यांनी तेवढा वेळ त्या गोष्टी समजायला दिलेल्या असतात. त्यामुळे रिटेल इनव्हेस्टर त्यांच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करू शकतात.

गुंतवणुकीत रिस्क जास्त

मार्केटमध्ये रिस्क ही सर्वांत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मिरर ट्रेडिंग जरी एक्सपर्ट ट्रेडर्सची काॅपी करून नफा मिळवण्यासाठी असली, तरी त्यातही तोटा होऊ शकतो. कारण, मार्केट कधी अस्थिर होईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे एक्सपर्टलासुद्धा ट्रेडिंगमध्ये तोटा होऊ शकतो. काहीच एक्सपर्ट चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांनी मार्केटमध्ये एकाच एक्सपर्टवर विसंबून न राहता. अन्य एक्सपर्टही शोधावे लागतील. त्यांनतर एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता. विविध ठिकाणी ती करण्याला प्राधान्य द्यावे लागेल.

तसेच, ज्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे, त्या एक्सपर्ट किंवा प्लॅटफाॅर्मची पूर्ण माहिती काढणे आवश्यक आहे. ते न करता गुंतवणूक केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. याचबरोबर पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहून गुंतवणूक केल्यास, तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. असे केल्याने, मार्केटविषयी जाणून घेण्याची किंवा शिकण्याची संधी आपण गमावून बसतो. त्यामुळे या दोन गोष्टीत आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. तेव्हाचा आपण मिरर ट्रेडिंगवरून चांगला रिटर्न मिळवू शकतो.

मिरर ट्रेडिंगचे नियम आहेत का?

भारतात मिरर ट्रेडिंगसाठी कोणताही नियम नाही आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या ट्रेडिंगच्या धोरणासारखा व्यापार करू शकते. काही दिवसांपूर्वी सेबीमध्ये या विषयी एका कंपनीने मिरर ट्रेडिंगची तक्रार दाखल केली होती. मार्केटला आशा होती की सेबी याविरोधात आक्षेप नोंदवेल. पण, तसे काही झाले नाही. त्यानंतर मिरर ट्रेडिंगची सर्वत्र चर्चा सुरू झाली.