Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Opening Bell: शेअर मार्केटला उतरती कळा; सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला; अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम

share market live

मागील आठ दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती. त्याला आज ब्रेक लागला. गुरुवारी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. अमेरिकन भांडवली बाजार घसरल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी कोसळून 60324 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,777.30 अंकांवर आला आहे.

Market Opening Bell: आज (गुरुवार) भारतीय शेअर बाजाराला उतरती कळा लागली. मागील सलग 8 दिवसांपासून बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, आता सकाळी बाजार सुरू होताच निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक लाल रंगात ट्रेड करत आहेत. अमेरिकन भांडवली बाजार घसरल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी कोसळून 60324 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,777.30 अंकांवर आला आहे.

कोणते शेअर्स आहेत चर्चेत?

निफ्टी 50 निर्देशांकातील अपोलो हॉस्पिटल, ब्रिटानिया, एचडीएफसी लाइफ, ओएनजीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या शेअर्सचे भाव वधारले. तर इंडसंड बँक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, HCL टेक आणि टीसीएस कंपनीचे शेअर्स खाली आले. काल आयटी जायंट TCS ने चौथ्या तिमाहीतील नफ्याची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी सकारात्मक असल्याने कंपनीचा भाव काल वाढला होता. मात्र, आज पुन्हा टीसीएसच्या शेअर्सते भाव खाली आले. इन्फोसिस कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले नाहीत. मात्र, त्याआधीच शेअर्स 2% नी खाली आले. 

बँक निफ्टी निर्देशांक 36 अंकांनी कोसळून 41,521.20 वर आला आहे. आज गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराने Balrampur Chini Mills आणि Delta Corp securities या कंपन्यांना व्यवहार करण्यास निर्बंध घातले आहेत. मार्केट वाइड पोझिशन लिमिट ओलांडल्याने एनएसईने हा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन कंपन्यांना F&O contracts चे व्यवहार करता येणार नाहीत.

परदेशी गुंतवणुकीचा विचार करता काल (बुधवार) परदेशी गुंतवणुकदारांनी (FII) भारतीय भांडवली बाजारात 1,907.95 कोटी रुपये गुंतवले तर 225.22 कोटी किंमतीचे शेअर्स विकले. आज कच्च्या तेलाच्या किंमतीही खाली आल्या.

अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीवर लक्ष

अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून महागाईची आकडेवारी या महिन्यात सादर केली जाणार आहे. जर भाववाढ दिसून आली तर फेडरल बँक व्याजदर वाढ करू शकते. त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. फेडरल बँकेने मागील काही बैठकांमध्ये सतत व्याजदर वाढ केली आहे. आता पुढील पतधोरण बैठकीकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच दरवाढीला लगाम लावला. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दरवाढ हा एकमेव पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने दरवाढ रोखली. मागील सहा सत्रात रेपो रेट वाढवल्यानंतरही भारतामध्ये महागाई कमी झाली नाही. ही एक चिंतेची बाब आहे.