एमएसटीसी लिमिटेडचा शेअर 27 मार्च 2020 ला 76 रुपयांच्या निचांकी स्तरावर पोहचला होता. मात्र, त्याच शेअरने आता 412 रुपयाचा उच्चांक गाठला आहे. जवळपास 3 वर्षातच या शेअरने गुतंवणुकदारांना 400 टक्क्यांच्यावर नफा मिळवून दिला आहे. म्हणजे ज्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असतील त्यांना आता 5 लाखांचा नफा झाला असता. यामुळे गुंतवणुकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. एवढा रिटर्न कमी वेळात मिळाल्याने लोकांचा शेअर खरेदीवर जोर दिसत आहे.
महिन्यात भाव 27 टक्क्यांनी वाढला
बुधवारी एमएसटीसी लिमिटेडच्या शेअरने 423 रुपयांच्या उच्चांकावर झेप घेतली होती. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 439 रुपये आहे. मागील एका महिन्यात एमएसटीसीच्या शेअरचा भाव 27 टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील सहा महिन्यात गुतंवणुकदरांना शेअरने 36 टक्क्यांचा रिटर्न मिळवून दिला आहे. तर 5 वर्षात 273 टक्क्याचा रिटर्न देवून श्रीमंत केले. शुक्रवारी बीएसईवरील उपलब्ध माहितीनुसार, मार्केट उघडले त्यावेळी शेअरचा रेट 407.05 रुपये होता. तर 11 वाजता 3 रुपयांनी वाढून तो 410.10 रुपयांवर व्यवहार करत होता.
शेअरवर हवे लक्ष!
एमएसटीसी लिमिटेडच्या शेअरचा मार्केट कॅप 2937 कोटी रुपयांचा आहे. एमएसटीसी कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना 33.6 टक्के रिटर्न दिला आहे तर कॅपिटलवरील रिटर्नच्या बाबतीत तो 38 टक्के आहे. गेल्या तिमाहीचा परिणाम पाहिल्यास, एमएसटीसीने विक्रीत 0.36% ची वाढ नोंदवली आहे आणि ती 197 कोटींवर पोहोचली आहे. कंपनीचा नफा 19 टक्क्यांनी वाढला असून त्याने 95 कोटीचा आकडा पार केला आहे. शेअर्समध्य गुंतवणूक करून कमवायचे असल्यास, तुम्हाला शेअरवर लक्ष ठेवून रहावे लागेल.
एमएसटीसी लिमिटेडविषयी
ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील ट्रेडिंग कंपनी असून केंद्रीय सरकारच्या अंतर्गत येते. कंपनीची सुरूवात 9 सप्टेंबर 1964 साली पश्चिम बंगाल येथे झाली. कंपनी आयात-निर्यातीसह ई-काॅमर्स, ई-ऑक्शन, मिनरल आणि मेटलमध्ये कार्यरत आहे. तसेच, कंपनीला श्रेणी-1 चा दर्जा मिळालेला आहे.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)