एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह यांनी 3 मिड कॅप शेअर्स निवडले आहेत. या स्टॉक्सचे ट्रिगर सांगितले. त्याचबरोबर लॉन्ग, पोझिशनल आणि शॉर्ट टर्मसाठी या शेअर्सचं टार्गेटही देण्यात आलं आहे. त्यांनी पॉवर ग्रीड (Power grid), रेडिंग्टन (Redington) आणि जीएसएफसीचे (GSFC) शेअर्स खरेदीसाठी निवडले आहेत. झी बिझनेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.
होईल पॉवरफुल पोर्टफोलिओ
एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह यांनी यासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले, की पॉवर सेक्टरवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. म्हणून लॉन्ग टर्मसाठी आम्ही पॉवर ग्रीडच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की स्टॉकचा चार्ट पॅटर्न टेक्निकली तेजीत दिसत आहे. शेअर 244 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. सध्याच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी 230 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. पॉवर ग्रीडवर लॉन्ग टर्मसाठी पहिले लक्ष्य 285 रुपये आणि दुसरं लक्ष्य 300 रुपये आहे.
रेडिंग्टनमधून तर नफाच नफा
पोझिशनल पिकसाठी कुणाल शाह यांनी रेडिंग्टन स्टॉकला प्राधान्य दिलं आहे. ते म्हणाले, की स्टॉकनं 4-5 दिवसांपूर्वी चांगला ब्रेकआउट दिला होता. सध्या हा शेअर 191 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. सध्याच्या पातळीवर खरेदीचा सल्ला दिला जात आहे. या समभागाचा 175 रुपयांचा स्टॉपलॉस आहे. एक मजबूत आधार तो मानला जातो. स्टॉकवर 220 आणि 235 रुपयांचं लक्ष्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई
अल्प मुदतीसाठी तज्ज्ञांनी खत (Fertilizer) क्षेत्रातून शेअर्स निवडले आहेत. या अंतर्गत जीएसएफसीवर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. कुणाल शहा म्हणाले, की गेल्या पाच-सहा दिवसांचा उच्चांकही ओलांडला आहे. आरएसआयवरदेखील तो सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे एकूणच शेअरवर खरेदीचा सल्ला दिला जातोय. शेअर 164-165 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. त्यामुळे सद्यस्थितीच्या पातळीवर तो खरेदी करा. यासाठी 155 रुपयांचा स्टॉप लॉस आहे. स्टॉकवर 171 आणि 180 रुपयांचं लक्ष्य देण्यात आलं आहे.