Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onion Price : कांद्याचा लिलाव बेमुदत बंद, काय आहेत कारणे? कांदा सणासुदीत रडवणार…

मॉन्सूनच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले होते. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली होती. खरीपाची पिके ऑक्टोबर नंतर बाजारात येण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे नवीन पिक बाजारात येईपर्यंत आहे त्या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Onion Procurement : नाफेड 2 लाख टन कांदा खरेदी करणार; पण काय आहेत खरेदीचे निकष?

कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावताना केंद्र सरकारने कांद्याचा बफरस्टॉक वाढवण्याचा निर्णय देखील घेतला होता. त्यानुसार केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून राज्यातील शेतकऱ्यांचा 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. यासाठी राज्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील कांद्याची ही खरेदी प्रति क्विटल 2410 रुपये दराने केली जाणार आहे.

Read More

Onion Prices Hike: देशभरात कांद्याच्या किंमतीत वाढ, आवक घटल्याने भाववाढीचे सावट

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना आता कांद्याची भाववाढ सामान्य नागरिकांना रडवणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र कांद्याची ही भाववाढ महिनाभरच राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read More

Amravati Market: अमरावतीमधील फळे आणि भाजीपाला मार्केटची वार्षिक उलाढाल 15 कोटींवर

Amravati Market: विदर्भातील अमरावती शहर 'अंबानगरी' म्हणून ओळखले जाते. विदर्भातील सर्वात मोठे कपडा मार्केट इथे आहे. बिझीलँड, सिटीलँड हे इथले सर्वात मोठे कपडा मार्केट आहे. कपडा मार्केटबरोबरच अमरावतीमध्ये भाजीपाला आणि फळ मार्केटसुद्धा आहे. या मार्केटमध्येही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

Read More

Onion Subsidy: कांदा अनुदान मिळवण्यासाठी 'असा' करू शकता अर्ज

Onion Subsidy: कांद्याचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यांची परिस्थिती लक्षात घेता सरकारने त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल असे अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Nashik village for sale: शेतमालाला भाव नाही म्हणून, गावकरी करणार चक्क गाव विक्री..

Malvadi village for sale: कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गावात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संतापून चक्क गाव विकायला काढलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आमचे गाव विकत घ्यावे असा ठराव मांडला आहे.

Read More

Maharashtra Onion Crisis : कांदा शेतकऱ्याला का रडवतोय?

Maharashtra Onion Crisis: कांद्याचा भाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय. अलीकडेच वाहतुकीचाही खर्च निघत नाही म्हणून एका शेतकऱ्याला 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाहीए. आणि वर निर्यातही थांबवीय. कांद्याच्या बाबतीत नेमकं काय घडतंय?

Read More

India's Onion Exports : कांद्याच्या निर्यातीत 38 टक्के वाढ

चालू आर्थिक वर्षात भारतीय कांद्याची निर्यात (India's Onion Exports) झपाट्याने वाढत आहे. पहिल्या 7 महिन्यांतच गेल्या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीच्या 88 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मागील याच कालावधीच्या तुलनेत त्याची निर्यात 38 टक्क्यांनी (38 percent increase in onion exports) वाढली आहे.

Read More

Onion Paste Business: फक्त 5 लाखांमध्ये सुरू करा कांद्याची पेस्ट तयार करण्याचा व्यवसाय

Onion Paste Business: हल्ली प्रत्येकजण रेडिमेड(readymade) वस्तूंचा वापर करत आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टनुसार कांद्याची पेस्ट(Onion Paste) बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.

Read More