Malvadi village for sale: कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गावात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संतापून चक्क गाव विकायला काढलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आमचे गाव विकत घ्यावे असा ठराव मांडला आहे.
Nashik village for sale: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गावकऱ्यांनी (Malvadi villagers) स्वत:च गाव विक्रीस काढले आहे. देवळा तालुक्यातील फुले माळवाडी गावात सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. गावकरी आपल्या गावाच्या विक्रीचा हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवणार आहेत. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या गावाची विक्री सुरू (Nashik village for sale news) असल्याची चर्चा पसरली आहे.
शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने गाव विक्रीस काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चक्क गाव विक्रीचा निर्णय घेऊन नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी गावातील नागरिकांनी राज्य शासनाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. फुलेमाळवाडी गावातील लोकांनी आपला संताप व्यक्त करण्याचा हा वेगळाच मार्ग शोधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. उत्पादन खर्चही काढता येत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
जास्त नाही पण रास्त भाव सरकारने दिला पाहिजे…..
फुले माळवाडी गावचे सरपंच मिडियाशी बोलतांना म्हणाले, 3500 लोकसंख्या असलेल्या आमच्या गावात 3 हजार लोक फक्त शेतीवर अवलंबून आहे आणि प्रमुख पीक हे कांदा आहे. कांद्याला भाव नाही मग आत्महत्या हा पर्याय उरतो पण आत्महत्या केल्यापेक्षा गावच सरकारने विकत घ्यावं.
कांद्याला 3 हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्याव किंवा गाव विकत घ्याव.
गाव विकत घेऊन एक एकरला 50 लाख रुपये देऊन आम्हाला मोकळं करावं. आम्ही आमचं आयुष्य सुखाने जगू. आता शेतकऱ्याकडे फक्त कमरेला काळा कळदोरा राहिलाय कारण तो कोणी घेणार नाही म्हणून.
पैसे बूडवून जाणारे सरकारला चालतात पण आपल्या मेहनतीचा मोबदला सरकार शेतकऱ्याला देऊ शकत नाही. शेतकरी शेतात गेल्यावर घरी येईलच याची गॅरंटी नसते, जीव धोक्यात घालून फुलवलेला मळा बहरून आला आणि त्याला भाव काय तर 2 रुपये. सरकारने आमचं गाव विकत घ्यावं आणि आम्हाला मोकळं करावं.. आम्ही शेती विकून पैसे मागत आहोत, असेही सरपंच म्हणाले.
शेतकरी ग्रामस्थ ठराव पत्र
http://www.saamtv.com/
शेतकऱ्यांच्या खर्चावर सरकार केवळ शहरी ग्राहकांची काळजी घेतात…..
विविध गावातील शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कांदा, गहू, भाजीपाला, नगदी पिकांसह कोणत्याही वस्तूला योग्य भाव मिळत नसल्याचे गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अशा परिस्थितीत फुलेमाळवाडी गावातील लोकांना आपला संताप व्यक्त करण्याचा हा अनोखा मार्ग पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या खर्चावर सरकार केवळ शहरी ग्राहकांची काळजी घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याची परिस्थिती समोर आली आहे. फुलेमाळवाडी गावात सुमारे 534 हेक्टर जमीन आहे. संपूर्ण गाव शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे लहान मुले व तरुणांच्या शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजा भागवणेही कठीण होत आहे.
अशा स्थितीत गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना एकत्र केले आणि चर्चेअंती गाव विक्रीचा हा प्रस्ताव मंजूर केला.
सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे…..
शासना कडून याबाबत अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की,
‘राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून राज्य सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.’
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून राज्य सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 7, 2023
Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.
भारतात गंभीर आजारांवर उपचार घेत असलेले नागरिक अनेकदा परदेशातून औषधे मागवत असतात. यासाठी त्यांना औषधांवर अतिरिक्त शुल्क देखील भरावे लागते.आता मात्र विशेष वैद्यकीय हेतूंसाठी असलेल्या अन्न आणि औषधांच्या आयातीवर मूलभूत सीमा शुल्कात संपूर्ण सूट भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
Ponniyin selvan 2: 2022 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पोन्नियिन सेल्वन भाग - 1’. याचाच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला 28 एप्रिलला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यानिमित्ताने या चित्रपटातील स्टार कलाकारांनी नेमके किती मानधन घेतले आहे, याबद्दल आज जाणून घेऊयात.