Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onion Paste Business: फक्त 5 लाखांमध्ये सुरू करा कांद्याची पेस्ट तयार करण्याचा व्यवसाय

Onion Paste Business:

Onion Paste Business: हल्ली प्रत्येकजण रेडिमेड(readymade) वस्तूंचा वापर करत आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टनुसार कांद्याची पेस्ट(Onion Paste) बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.

Onion Paste Business: हल्लीच्या घाईगडबडीच्या जगात प्रत्येकालाच जास्त कष्ट न करता सहज गोष्टी हव्या असतात. हीच गोष्ट किचनमध्ये स्वयंपाक(Cooking) करतानाही लागू पडते. सध्या रेडिमेड(readymade) वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बाजारात रेडिमेड खाद्यपदार्थांनाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. आता तर बाजारात रेडिमेड भाज्याही(readymade vegetables) उपलब्ध झाल्या आहेत.

सध्या बाजारपेठेत कांद्याची  रेडिमेड पेस्ट((readymade onion paste) सहज उपलब्ध होते. अनेक कंपन्यांनी आता कांद्यावर प्रक्रिया करून त्याची पेस्ट बनवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांकडून या पेस्टला पसंती मिळत असून, तिची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? डोळ्यात पाणी आणणारा हा कांदा तुमच्या खिशात पैसाही आणू शकतो. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर नुकताच खादी ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायाचा एक रिपोर्ट(Report) तयार केला आहे. त्यानुसार, अशी माहिती देण्यात आली आहे की, कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायाबद्दल.

कोणत्या गोष्टींची आवश्यकता व्यवसायासाठी आहे? 

कांद्याची पेस्ट बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किमान 300 ते 500 चौरस फूट जागा(Land) हवी आहे. कांद्याची पेस्ट बनवण्याचा कारखाना काढण्यासाठी एक लाख रुपयांची गुंतवून करून त्या मोकळ्या जागेवर शेड बनवावी लागेल. तर, पेस्ट तयार करण्यासाठी फ्राइंग पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, लहान भांडी, मग, कप इत्यादी साहित्य घेण्यासाठी जवळपास  1.75 लाख रुपये खर्च करावा लागेल.

या गोष्टींसाठी राखीव ठेवा 2.75 लाख रुपये

हा व्यवसाय चालवण्यासाठी तुमच्याकडे राखीव 2.75 लाख रुपये ठेवावे लागतील. कच्चा मालाची खरेदी, मालाचे पॅकिंग, वाहतूक आणि कामगारांचे पगार इत्यादींवर खर्च करण्यासाठी या पैशांची मदत होईल.

व्यवसायासाठी कर्ज मिळेल का?

या युनिटमध्ये एका वर्षात सुमारे 193 क्विंटल कांद्याची पेस्ट तयार होऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील, तर सरकार तुम्हाला यासाठी आर्थिक मदत करू शकते. या व्यवसायासाठी तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज(Mudra Loan) घेऊ शकता आणि हा व्यवसाय उभारू शकता.

कितपत होऊ शकते कमाई?

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या रिपोर्टनुसार, तुम्ही पूर्ण क्षमतेने कांद्याची पेस्ट तयार केली, तर तुम्हाला एका वर्षात 7.50 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. यातून सर्व खर्च वजा केल्यास 1.75 लाख रुपयांचा नफा तुम्हाला सहज मिळू शकतो. तुमच्या मार्केटिंगवर(Marketing) देखील या व्यवसायातील नफा अवलंबून आहे. होलसेल माल विकण्याऐवजी तुम्ही थेट ग्राहकांना किरकोळ विक्री केलीत तर तुम्हाला जास्त नफा मिळण्यास मदत होईल.

कांदा हा नाशवंत शेतमाल आहे. त्यामुळे नोकरीसाठी भटकत राहण्यापेक्षा हा व्यवसाय करून तरुणांना स्वतःला तर रोजगार मिळेलच पण यासोबत इतरांना रोजगार मिळण्यास मदत होईल. अलीकडच्या काळात कृषिपूरक उद्योग-व्यवसायांना चांगले दिवस आले असून ग्रामीण भागामध्ये राहूनही असे उद्योग सुरू करता येतात. कांद्याची पेस्ट तयार करण्याचा व्यवसाय हा त्यापैकीच एक आहे.