ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण म्हणजे कांद्याचे गोदाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत कालावधीसाठी बेमुदत बंद ठेवण्यात आला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सरकारकडे काही मागण्यांची यादी पाठवली आहे. जोपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय होत नाही तोवर आम्ही कांदा लिलावात सहभाग घेणार नाही असे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
येणाऱ्या काळात याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर पडणार आहे, याचे कारण म्हणजे कांद्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.
यंदा उत्पादन देखील कमी
मॉन्सूनच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले होते. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली होती. खरीपाची पिके ऑक्टोबर नंतर बाजारात येण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे नवीन पिक बाजारात येईपर्यंत आहे त्या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.
In #Maharashtra, #onion traders from Nashik district have threatened to stop onion auctions from tomorrow.
— All India Radio News (@airnewsalerts) September 19, 2023
They are demanding withdrawal of export duty hike, uniform commission across the country and purchase of onion by #NAFED & #NCCF in Agriculture Products Market… pic.twitter.com/6wDNxvKlYy
लिलाव बंद
शेतकऱ्यांनी आणि कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय घेतला असून नाशिक जिल्ह्यातील 15 कृषी उत्पन बाजार समित्यांतील जवळपास 500 व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे. एक टक्का बाजार शुल्क अर्धा टक्क्यावर करावे अशी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. याशिवाय इतर राज्यातील व्यापाऱ्यांकडून 4% आडत शुल्क घ्यावे आणि सरकारी नाफेड और एनसीसीएफद्वारे देशातील इतर भागांमध्ये कमी दरात कांदा विक्री करू नये अशी आंदोलकांची मागणी आहे.