Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Bill: वीज बिल भरताना केवळ 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार रोखीने, महावितरणचा निर्णय!

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ग्राहकांना येत्या 1 ऑगस्ट 2023 पासून केवळ पाच हजार रुपये पर्यंतची वीज बिले रोखीने भरता येणार आहेत. ज्या ग्राहकांची वीज बिले 5 हजारांपेक्षा अधिक असतील त्यांना ऑनलाइन पद्धतीने वीज वितरण कंपनीच्या खात्यात पैसे जमा करावे लागणार आहेत.

Read More

Electricity Tariff Rule: वीज बिलात 20% बचत होणार! कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार दर आकारणीचा नियम जाणून घ्या

ऊर्जा मंत्रालयाने देशभरात वीज बील आकारणी नियमावलीत बदल केला आहे. नव्या नियमांनुसार ग्राहकांना 20% पर्यंत वीजबील वाचवता येईल. दिवसभरात तुम्ही कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार विजेचे दर ठरतील. जेव्हा विजेची मागणी जास्त असेल तेव्हा प्रति युनिट दरही जास्त राहील. जेव्हा विजेचा दर सर्वात कमी आहे तेव्हा घरकामे उरकून नागरिक बील कमी करू शकतात.

Read More

Electricity Bill Fraud Alert: वीजबिल WhatsApp वर आलं असेल तर सावधान! होऊ शकते तुमची आर्थिक फसवणूक

'आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन बंद केले जाणार आहे, तत्काळ बिल भरा किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करा' अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हांला देखील आलाय का? आला असेल तर वेळीच सतर्क व्हा! सायबर चोरांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो लोकांची फसवणूक केली आहे...

Read More

Delhi Free Electricity: दिल्लीमध्ये मोफत वीज सवलत आणि अनुदान तडकाफडकी बंद, केजरीवाल सरकारचा नायब राज्यपालांवर आरोप

Delhi Free Electricity: दिल्ली सरकारकडे सबसिडी देण्यासाठी पैसे आहेत,तशी तरतूद देखील मंत्रिमंडळाने केली आहे.परंतु जोवर उपराज्यपाल मंजुरी देत नाही तोवर सरकारला सबसिडी देता येणार नाहीये अशी माहिती मंत्री आतिशी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 2016 ते 2022 दरम्यान खाजगी वीज कंपन्यांना सबसिडीसाठी दिलेल्या 13,549 करोड रुपयांचं ऑडिट झालं पाहिजे अशी भूमिका नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी घेतली आहे.

Read More

Electricity Bill: विजबिल कमी करण्यासाठी काय उपाय करू शकतो?

Electricity Bill: उन्हाळा सुरू झाला की विजेचा वापर सुद्धा वाढतो. फॅन, कुलर, एसी, फ्रीज या सर्व उपकरणांचा वापर सुरू होतो त्यामुळे विजबिलाच्या रकमेत वाढ होते. वीज बील कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे.

Read More

Pending Electricity Bill: थकित वीज बिलांवर शेतकऱ्यांचे 145 कोटी माफ, पुणे जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद

Pending Electricity Bill: मार्च महिन्यात शेतीपंपाच्या थकित वीजबिलासाठी तीस टक्के सवलत दिली होती. आता त्याचा लाभ घेण्याची मुदत मार्चअखेर संपुष्टात आली. महावितरणच्या पुणे परिमंडळातील 22 हजार 826 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

Read More

Electricity Bill कमी करायंच असेल तर WiFi कसं वापराल?

Electricity Bill Hacks : घरी WiFi असेल तर आपले मोबाईलही त्याला जोडलेले असल्यामुळे राऊटर पूर्ण वेळ सुरू राहतो. अलीकडे लोक घरातूनही काम करत आहेत. त्यामुळे WiFi चा उपयोग होत असला तरी वीज बिलही वाढतं. WiFi मुळे नेमकं किती बिल वाढतं आणि ते कमी करण्यासाठी काय करावं?

Read More

Rising Heat in India: वाढत्या उष्णतेसोबत देशात वीजटंचाईचे संकट, विजेची मागणी वाढली

Surging Electricity Demand in India: उष्ण हवामानामुळे शेतीतील सिंचन पंप आणि एअर कंडिशनरचा वापर विजेची मागणी वाढवणार आहे. यामुळे देशाच्या ऊर्जा व्यवस्थेवर ताण पडणार आहे. आयात केलेल्या कोळशाचा वापर करणाऱ्या वीज केंद्रांना उन्हाळ्याच्या हंगामात तीन महिने पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जेणेकरून ब्लॅकआउट म्हणजेच भारनियमन टाळता येईल

Read More

India Power Shortage : …तर पुढच्या वर्षी देशात वीज तुटवडा भासू शकतो   

दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढून तुटवडा भासू लागतो. याची दखल घेऊन ऊर्जा मंत्रालयाने यंदा सरकारी वीज निर्मिती कंपन्यांना नैसर्गिक वायू इंधन आयात करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, ही प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली नाही तर ऐन उन्हाळ्यात ऊर्जा संकट उभं राहू शकतं.

Read More