Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Bill कमी करायंच असेल तर WiFi कसं वापराल?

WiFi router

Electricity Bill Hacks : घरी WiFi असेल तर आपले मोबाईलही त्याला जोडलेले असल्यामुळे राऊटर पूर्ण वेळ सुरू राहतो. अलीकडे लोक घरातूनही काम करत आहेत. त्यामुळे WiFi चा उपयोग होत असला तरी वीज बिलही वाढतं. WiFi मुळे नेमकं किती बिल वाढतं आणि ते कमी करण्यासाठी काय करावं?

Electricity Bill Hacks: इंटरनेटच्या युगात, वायफाय राउटर एक आवश्यक उपकरण बनलं आहे. यासोबतच कार्यालयीन कामातही वायफायचा वापर केला जातो. वर्क-फ्रॉम-होममुळे घरीही राऊटरची गरज पडते. आणि ही सेवा घेतलीही जाते.

आपला मोबाईलही आपण वाय-फायला जोडतो. त्यामुळे अनेकदा घरातला वाय-फायही चोवीस तास सुरूच राहतो. असा हा राऊटर नेमकी किती वीज खातो याचा विचार केला आहे कधी?

तुमच्या घरातील इतर डिव्हाइसेसशी कनेक्ट करतात, तुमचे वाय-फाय राउटर चालू असते. राउटर विजेवर असल्याने तो तासन्तास प्लग इन राहतो. मग तुमचा वायफाय राउटर किती वीज खातं असेल? ते जाणून घेऊया. आणि हे वीज कसं कमी करायचं ते ही पाहू.

वायफाय राउटरचा वीज वापर किती? 

वायफाय राउटरचा वीज वापर तो किती काळ वापरला जातो या आणि इतरही गोष्टींवर अवलंबून असतो. सामान्यतः भारतातील वाय-फाय राउटर प्रति तास 6 ते 20 वॅट वीज वापरतो. उपकरणाचं वीज रेटिंग आणि वापराच्या पद्धतीवर नेमका वीज वापर ठरतो.

उदा.  राउटर प्रति तास सरासरी 10 वॅट्स वापरत असेल. आणि दिवसाचे 24 तास तो सतत वापरात असेल, तर त्याचा दिवसाचा ऊर्जेचा वापर पुढील प्रमाणे असेल.

प्रति तास वीज वापर x प्रतिदिन वापरल्या जाणार्‍या तासांची संख्या = प्रति दिन ऊर्जा वापर

10 वॅट x 24 तास = 240 वॅट-तास

याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमचे वायफाय राउटर 24 तास सतत वापरत असाल तर ते दररोज 240 वॅट पॉवर वापरू शकते.

एका महिन्यात किती बिल येऊ शकतं?

वायफाय राउटरच्या मासिक वीज वापराची गणना करण्यासाठी, एका महिन्यातील दिवसांच्या संख्येने म्हणजे 30 दिवसांनी दैनिक वापर गुणाकार करावा लागेल.

प्रतिदिन वापरण्यात येणारी ऊर्जा x महिन्यातील दिवसांची संख्या = दरमहा वापरण्यात येणारी ऊर्जा

240 Wh x 30 = 7200 Wh किंवा 7.2 kWh

म्हणजेच तुम्ही तुमचे वायफाय राउटर महिनाभर सतत वापरत असलो तरी ते सुमारे 7.2 किलोवॅट तास वीज वापरू शकते. भारतातील विजेची किंमत राज्यानुसार बदलते. भारतात विजेची सरासरी किंमत प्रति किलोवॅट तास 7 ते 10 रुपये आहे. समजा विजेची किंमत 9 रुपये प्रति किलोवॅट तास असेल तर 7.2 kWh x 9 = Rs 64.8 बनते. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमचे वायफाय राउटर महिनाभर सतत वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला 64.8 रुपये इतकं वीज बिल लागू होईल.

वीज कशी वाचवायची?

तुमच्या घरात वाय-फाय इन्स्टॉल केलं असल्यास, अनावश्यक किंवा अनोळखी डिव्हाइसेस हटवा. तुमचा वायफाय हाइड ठेवा. अधिक उपकरणे कनेक्ट केल्याने राउटरवर दबाव वाढू शकतो आणि अधिक वीज वापरली जाते. आपल्याला गरज नसताना अॅडाप्टरसह वायफाय राउटर बंद करा. तुमच्याकडे फक्त एक कनेक्शन असल्यास, तुमची LAN केबल थेट तुमच्या PC/Laptop वर वापरा. वायफाय राउटर तुमच्या डिव्‍हाइसजवळ ठेवा, कारण ते लांब अंतरावर वायफाय कनेक्‍शन जोडण्‍यासाठी अतिरिक्त वीज वापरतात.