Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Tariff Rule: वीज बिलात 20% बचत होणार! कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार दर आकारणीचा नियम जाणून घ्या

Tips to reduce light bill

ऊर्जा मंत्रालयाने देशभरात वीज बील आकारणी नियमावलीत बदल केला आहे. नव्या नियमांनुसार ग्राहकांना 20% पर्यंत वीजबील वाचवता येईल. दिवसभरात तुम्ही कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार विजेचे दर ठरतील. जेव्हा विजेची मागणी जास्त असेल तेव्हा प्रति युनिट दरही जास्त राहील. जेव्हा विजेचा दर सर्वात कमी आहे तेव्हा घरकामे उरकून नागरिक बील कमी करू शकतात.

Electricity Tariff Rule Change: वाढते वीज बील हे भारतातील कोट्यवधी कुटुंबांसाठी चिंतेचा विषय आहे. मागील काही वर्षांपासून वीज बिलाचा आकडा सातत्याने वाढतोय. (Electricity Tariff time of the day rule) उद्योग व्यवसायांना लागणाऱ्या विजेचे दरही वाढले आहे. मात्र, आता घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज बिलात 20% पर्यंतची बचत करता येणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने वीज नियमावली 2020 मध्ये बदल केले आहेत. त्यानुसार टाइम ऑफ डे (time of the day- ToD) हा नवा नियम आणला आहे.

टाइम ऑफ डे दर आकारणी कशी असेल?

टाइम ऑफ डे (time of the day- ToD) दर आकारणीनुसार दिवसभरात विजेचे दर बदलत राहतील. जेव्हा विजेची मागणी सर्वाधिक असते तेव्हा प्रति युनिट दर जास्त असेल तर जेव्हा विजेची मागणी कमी असेल तेव्हा विजेचा प्रति युनिट दरही कमी असेल. (Electricity Tariff time of the day rule) ग्राहकांनी विजेची मागणी कमी असताना घरातील सर्व कामे उरकली तर कमी वीज बिल भरावे लागेल. वॉशिंग मशिन, कुकिंग, AC, इस्त्री अशा उपकरणांचा वापर वीजेची सर्वाधिक मागणी असताना टाळल्यास बील कमी येईल.

दिवसा विजेचा दर कमी राहील 

ऊर्जा मंत्रालयाने हे नवे बदल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहेत. दिवसाचे 8 तास म्हणजेच सोलार हावरमध्ये (सौरऊर्जा) विजेचा प्रति युनिट दर कमी राहील. कारण अशा वेळी सौरऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. (ToD rule of Electricity) ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी असल्याने ग्राहकांना वीजही स्वस्तात मिळेल.

त्या तुलनेत संध्याकाळी औष्णिक, जलविद्युत आणि नॅचरल गॅस आधारित स्रोतांद्वारे वीज निर्मिती होते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी विजेचे दर जास्त राहतील. रात्रीच्या वेळी विजेची मागणीही जास्त असते. अशा वेळी विजेचे दर 10 ते 20% जास्त राहू शकतात.

नवे नियम कधीपासून लागू होतील?

ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर्स असतील त्यांना नवे नियम तत्काळ लागू होतील. तसेच ज्या उद्योगांची विजेची गरज 10KW पेक्षा जास्त आहे त्यांना नवे नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील. तर घरगुती आणि इतर सर्वसामान्य वापरासाठी नवे नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. त्यासाठी स्मार्ट मीटर असणे आवश्यक आहे. (ToD rule of Electricity) स्मार्ट मीटरद्वारे दिवसभरातील विविध काळात वीजदर किती आहे हे सुद्धा ग्राहकांना समजेल. त्यानुसार घरगुती कामांचे नियोजन ग्राहकांना करता येईल.

मागणी आणि पुरवठ्याचे गणित

नवे दर विजेची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतील. जेव्हा विजेची मागणी सर्वात जास्त असेल तेव्हा दरही जास्त आणि मागणी कमी तेव्हा विजेचा दरही कमी. इलेक्ट्रिसिटी ग्रीडद्वारे संपूर्ण देशभरात याचे व्यवस्थापन केले जाईल.

राज्याच्या State Electricity Regulatory Commissions (SERC) द्वारे दिवसभरातील विविध काळात विजेचे दर किती असतील हे ठरवण्यात येईल. काही राज्यांनी मोठ्या कंपन्या आणि उद्योगांना ToD सुविधा आधीपासून लागू केली आहे. आता घरगुती आणि इतर ग्राहकांनाही ही सुविधा मिळेल.