MSRTC@75Years: एसटीच्या 50% सवलतीत आतापर्यंत 10 कोटी महिलांनी केला प्रवास, 300 कोटींची झाली बचत
MSRTC@75Years: एसटी महामंडळाच्या दररोजच्या प्रवाशी संख्येत देखील वाढ झाली असून दररोज 55 लाख महिला प्रवासी योजनेचा लाभ घेत असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने महामनीशी बोलताना सांगितले."बहुजन हिताय बहुजन सुखाय" या ब्रिद वाक्याला अनुसरुन एसटी महामंडळाने मागील 75 वर्षात खेडोपाडी सेवा दिली आहे. महामंडळाकडून समाजातील विविध घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलती दिल्या जातात.
Read More