एमएसआरटीसीने (MSRTC - Maharashtra State Road Transport Corporation ) ज्येष्ठ नागरिकांच्या 34,88,000 स्मार्ट कार्डांची नोंदणी केली आहे. त्यापैकी 14, 69,000 कार्ड्स हे 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सर्व MSRTC बसमधून मोफत प्रवास करू शकतात. ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) 75 व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शिवनेरी बससह एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती (The Chief Minister gave the information)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde, Maharashtra CM) यांनी या योजनेची माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीकडून मोफत प्रवास योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. देशातील ‘अमृत महोत्सवा’निमित्त राज्यातील सुमारे दीड लाख 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळणार आहे.”
अशी मिळेल सुविधा
यापूर्वी 65 वर्षांवरील ज्येष्ठांना (Senior citizen Scheme) एसटी बस प्रवासात 50 टक्के सवलत मिळत होती, मात्र आता त्यांना एसी, स्लीपर कोच आणि शिवनेरी बसमधून प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. 75 वर्षांवरील व्यक्तींना या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना किंवा ओळखपत्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कंडक्टरला दाखवावे लागणार आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे.
सवलत योजनेची वैशिष्ट्ये (Features of discount scheme)
वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये 50 टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.