Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Trading : 13 जुलैपासून थांबतील HDFC च्या शेअर्सचे व्यवहार

एचडीएफसी बँकच्या विलीनि‍करणानंतर 13 जुलैला शेअर बाजारात एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्सचे ट्रेडिंग थांबवण्यात येणार आहे. एचडीएफसीच्या विलीनि‍करणानंतर HDFC ltd च्या शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स दिले जाणार आहेत. यासाठी यासाठी HDFC भागधारकांनी 25 शेअर्सच्या पटीत शेअर होल्डिंग राखणे आवश्यक आहे.

Read More

IDFC merger: आयडीएफसी फर्स्ट बँक-आयडीएफसी लिमिटेडचं विलीनीकरण, एचडीएफसीनंतरचा दुसरा मोठा करार

IDFC merger: आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बोर्डानं आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फायनान्शियल होल्डिंग कंपनीच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणानंतर आर्थिक क्षेत्रातला हा दुसरा सर्वात मोठा करार आहे.

Read More

Deepak Parekh: दिपक पारेख यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीला विराम; HDFC च्या प्रमुख पदावरुन निवृत्तीची घोषणा

एचडीएफसीला मागील चाळीस वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवल्यानंतर दिपक पारेख यांनी निवृत्तीची घोषणा केली. शुक्रवारी त्यांनी 78 व्या वर्षी संचालक पदावरुन निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. भावनिक पत्र लिहून त्यांनी समभागधारकांशी शेवटचा संवाद साधला. एकत्रीकरणानंतर एचडीएफसी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य कंपनी झाली आहे. यात दिपक पारेख यांचा मोलाचा वाटा आहे.

Read More

HDFC Home Loan: HDFC बँकेच्या होम लोनचे प्रीपेमेंट करायचंय? थांबा, जाणून घ्या काय होणार बदल?

तुम्ही जर येत्या काही दिवसांत तुमच्या चालू गृहकर्जाचे पेमेंट करण्याचा विचार करत असाल तर बँकेकडून फुल पेमेंट स्वीकारले जात नाहीये. कर्जासाठी केवळ पार्शल पेमेंट बँकेकडून स्वीकारले जात आहे. याचे कारण असे की एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची (HDFC Development Finance Corporation) विलनीकरण प्रक्रिया आजपासून म्हणजेच 1 जुलै 2023 पासून प्रभावी करण्यात आली आहे.

Read More

भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार! एकत्रीकरणानंतर HDFC Bank देशातील दुसरी बलाढ्य कंपनी

HDFC बँक आणि HDFC या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यामुळे एचडीएफसी बँक भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. जगभरातील बँकांच्या यादीतही एचडीएफसीने चौथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.

Read More

HDFC-HDFC Bank Ex Dividend: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचा डिव्हीडंड मिळवण्याची आज शेवटची संधी! जाणून घ्या सविस्तर

HDFC-HDFC Bank Ex Dividend: आज 16 मे 2023 रोजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांचे शेअर एक्स डिव्हीडंडवर ट्रेड करणार आहेत.1 जून 2023 पासून शेअरहोल्डर्सला डिव्हीडंड (लाभांश) दिला जाणार आहे.एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यानंतर 18 लाख कोटींची मालमत्ता असणारी देशात मोठी फायनान्स कंपनी म्हणून उदयास येणार आहे.

Read More

HDFC-HDFC Bank merger: एचडीएफसी विलीनीकरणामुळे गृहकर्जदारांवर काय परिणाम होईल? व्याजदर कमी होतील का?

HDFC-HDFC Bank merger: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन अशा दोन वेगळ्या कंपन्या आहेत. मात्र, लवकरच या दोन्ही संस्थांचे विलीनीकरण होणार आहे. ज्या ग्राहकांनी एचडीएफसी होम लोनमधून गृहकर्ज घेतले असेल ती सर्व कर्ज एचडीएफसी बँकमध्ये जमा केली जातील. गृहकर्जदारांवर या विलीनीकरणाचा काय परिणाम होऊ शकतो, ते आपण या लेखात पाहू.

Read More

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांचा ग्रीन सिग्नल

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी समूहातील दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांनी मंजुरी दिली आहे. एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे मालमत्ता मूल्य 18 लाख कोटी इतके असेल.

Read More