HDFC बँक आणि HDFC या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जगभरातील आणि भारतातील टॉप कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँकेने वरचे स्थान पटकावले आहे. (HDFC-HDFC bank merger) जगभरातील टॉप बँकांच्या यादीत एचडीएफसी बँक चौथ्या स्थानावर पोहचली आहे. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. एचडीएफसीने बाजार भांडवल आता 172 बिलियन डॉलरवर पोहचले आहे.
जगभरात एचडीएफसी बँकेच्या पुढे कोण?
अमेरिकेतील जे. पी मॉर्गन चेस ही बँक जगातील सर्वात मोठी बँक आहे. त्याखालोखात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे आयसीबी बँक आणि बँक ऑफ अमेरिका आहे. चौथ्या क्रमांकावर एचडीएफसी बँक आणि पाचव्या क्रमांकावर अॅग्रिकल्चर बँक ऑफ चायना आहे.
जगातील टॉप बँका बाजार भांडवल (बिलियन $ मध्ये)
जे. पी मॉर्गन चेस - 417
आयसीबीसी - 228
बँक ऑफ अमेरिका - 227
एचडीएफसी बँक - 172
अॅग्रिकल्चर बँक ऑफ चायना - 169
भारतातील टॉप कंपन्या कोणत्या?
बाजार भांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आता एचडीएफसी बँक आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे टीसीएस आणि आयसीआयसीआय बँक आहे. तर पाचव्या क्रमांकावर हिंदुस्तान युनिलिव्हर बँक आहे.
भारतातील टॉप 5 कंपन्या - बाजार भांडवल (कोटींमध्ये)
रिलायन्स इंडस्ट्रीज - 17,25,492
एचडीएफसी बँक -14,02,200
टीसीएस - 12,08,310
आयसीआयसीआय बँक - 6,53,879
हिंदुस्तान युनिलिव्हर - 6,29,256
भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार
कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 230 to 232 नुसार हे एकत्रीकरण पूर्ण झाले. संचालक मंडळाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. (HDFC-HDFC bank merger) एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी एकत्रीकरणाचा व्यवहार हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा ठरला आहे. एचडीएफीच्या शेअर होल्डर्सला 13 जुलैपर्यंत शेअर्स देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बँकेने दिली आहे. HDFC बँकेद्वारेच सर्व सेवा आणि सुविधा ग्राहकांना मिळतील.