Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC-HDFC Bank Ex Dividend: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचा डिव्हीडंड मिळवण्याची आज शेवटची संधी! जाणून घ्या सविस्तर

HDFC-HDFC Bank Ex Dividend

HDFC-HDFC Bank Ex Dividend: आज 16 मे 2023 रोजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांचे शेअर एक्स डिव्हीडंडवर ट्रेड करणार आहेत.1 जून 2023 पासून शेअरहोल्डर्सला डिव्हीडंड (लाभांश) दिला जाणार आहे.एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यानंतर 18 लाख कोटींची मालमत्ता असणारी देशात मोठी फायनान्स कंपनी म्हणून उदयास येणार आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना डिव्हीडंडसाठी (लाभांश)  पात्र ठरवण्यासाठी एक तारिख निश्चित (Record Date) केली जाते. रेकॉर्ड डेटपर्यंत शेअर खरेदी करणाऱ्या किंवा शेअर जवळ बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीकडून डिव्हीडंड दिला जातो. आज 16 मे 2023 रोजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांचे शेअर एक्स डिव्हीडंडवर ट्रेड करणार आहेत.1 जून 2023 पासून शेअरहोल्डर्सला डिव्हीडंड दिला जाणार आहे.

एचडीएफसी बँकेने प्रती शेअर 19 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर आहे. शेअरच्या दर्शनी मूल्यानुसार बँकेने 1900% इतका लाभांश जाहीर केला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपया इतके आहे. आगामी सर्वसाधारण सभेत डिव्हीडंडचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शेअर होल्डर्सला तो वितरित केला जाणार आहे. यासाठी 16 मे 2023 पर्यंत एचडीएफसी बँकेचे शेअर तुमच्या डिमॅट खात्यात असणे आवश्यक आहे.

hdfc-bank-2.jpg

आज मंगळवारी 16 मे 2023 रोजी एचडीएफसी बँकेचा शेअर 1.11% घसरणीसह 1657.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. सोमवारी 15 मे रोजी एचडीएफसी बँकेचा शेअर 1677 रुपयांवर बंद झाला होता. त्यात 0.55% वाढ झाली होती. मागील वर्षभरात एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 3% वाढ झाली आहे.

एचडीएफसी बँकेने 31 मार्च 2023 अखेर 12047 रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढ झाली होती. त्याचबरोबर बँकेच्या उत्पन्नात 31% वाढ झाली होती. एचडीएफसी बँकेला जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत 53851 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे जूनमध्ये विलीनीकरण पूर्ण होणार आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) समभागधारकांना यंदा 44 रुपये प्रती शेअर डिव्हीडंड जाहीर केला आहे. एचडीएफसीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये इतके आहे. एचडीएफसीच्या शेअरची रेकॉर्ड डेट 16 मे 2023 आहे. 1 जूनपासून कंपनी डिव्हीडंडचे वितरण करणार आहे.आज मंगळवारी एचडीएफसीचा शेअर 1.07% घसरणीसह 1658.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. कालच्या सत्रात सोमवारी एचडीएफसीचा शेअर 2785 रुपयांवर बंद झाला होता. त्यात 0.31% वाढ झाली होती.  

hdfc-3.jpg

जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत एचडीएफसीला 4425 कोटींचा नफा झाला होता. नफ्यात 20% वाढ झाली होती. कंपनीचा एकूण महसूल 36% ने वाढून 16679 कोटी इतका झाला. निव्वळ व्याजाचे उत्पन्न 16% ने वाढले आहे. चौथ्या तिमाहीत निव्वळ व्याजातून 5321 कोटींचा महसूल मिळाल्याचे एचडीएफसीने म्हटले होते.

गेल्या आठवड्यात दोन्ही शेअरमध्ये झाली मोठी घसरण

गेल्या आठवड्यात एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन्ही शेअरमध्ये 5% घसरण झाली होती. मागील तीन वर्षात एकाच दिवसात झालेली ही मोठी घसरण ठरली होती. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या प्रस्तावित मर्जरमुळे परदेशी फंडांनी दोन्ही कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्याने शेअरमध्ये घसरण झाल्याचे बोलले जाते. 

जूनपासून एचडीएफसी कंपनी होणार एचडीएफसी बँकेत विलीन

एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यानंतर 18 लाख कोटींची मालमत्ता असणारी देशात मोठी फायनान्स कंपनी म्हणून उदयास येणार आहे. भारतातील कॉर्पोरेटमधील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे विलीनीकरण आहे. या विलीनीकरणानंतर रेकॉर्ड डेटनुसार 25 एचडीएफसीचे शेअर असणाऱ्या गुंतवणूकदाराला 42 एचडीएफसी बँकेचे शेअर मिळणार आहेत.