तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे किंवा फायनान्सचे होम लोन घेतलेले असेल आणि तुम्ही एवढ्या एक दोन दिवसांत त्याचे फुल (Full Payment) किंवा पार्शल प्रीपेमेंट (Partial Payement) करायचा विचार करत असाल तर ही बातमी जरूर वाचा. सध्या HDFC बँक आणि HDFC फायनान्स या दोन कंपन्यांची विलय प्रक्रिया सुरु आहे. दोन कंपन्यांचा विलय झाल्यानंतर जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक म्हणून HDFC बँक लिमिटेड ही कंपनी समोर येणार आहे.
लोनवर याचा काय परिणाम होणार?
फायनान्स विश्वातील खरे तर ही एक मोठी घटना आहे. HDFC बँक आणि HDFC फायनान्स या दोन कंपन्यांचा विलय झाल्यानंतर 12 कोटी ग्राहक असलेली ही बँक जगातील चौथ्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्राहकसंख्या असलेली बँक म्हणून ओळखली जाणार आहे. आता एवढी मोठी ग्राहकसंख्या असलेल्या बँकेचे विलानीकरण होत असताना लोनवर याचा काही परिणाम होणार आहे हा असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
India’s No. 1 Private Sector Bank & India’s No. 1 Home Loans Company have merged to join the ranks of the world’s leading financial institutions.
— HDFC Bank (@HDFC_Bank) July 1, 2023
On this momentous occasion, we rededicate ourselves to serve those who made this milestone possible – You, our Customer.#HDFCBank… pic.twitter.com/0IUzP9L2Oc
प्रीपेमेंट करता येणार का?
तुम्ही जर येत्या काही दिवसांत तुमच्या चालू गृहकर्जाचे पेमेंट करण्याचा विचार करत असाल तर बँकेकडून फुल पेमेंट स्वीकारले जात नाहीये. कर्जासाठी केवळ पार्शल पेमेंट बँकेकडून स्वीकारले जात आहे. याचे कारण असे की एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची (HDFC Development Finance Corporation) विलनीकरण प्रक्रिया आजपासून म्हणजेच 1 जुलै 2023 पासून प्रभावी करण्यात आली आहे. यादरम्यान HDFC बँकेचे सॉफ्टवेयर अपडेट प्रक्रिया सुरु आहे. दोन्ही कंपन्यांचे ग्राहक एकाच पोर्टलवर आणण्याची प्रक्रिया पुढील 2-3 दिवस सुरूच असणार आहे. त्यामुळे कर्जाची नेमकी रक्कम किती हे बँकेची संपूर्ण सिस्टीम अपडेट झाल्यानंतरच कळणार आहे. या कारणामुळे सध्या केवळ पार्शल पेमेंटचा स्वीकार बँकेकडून केला जात आहे.
चालू कर्जाचे व्याजदर वाढणार का?
खरे तर HDFC बँक आणि HDFC फायनान्स या दोन्ही कंपन्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात तफावत आहे. HDFC बँकेपेक्षा HDFC फायनान्सचे व्याजदर अधिक आहे. या दोन कंपन्यांचे विलनीकरण झाल्यानंतर गृहकर्जात किंवा ऐतर स्वरूपाच्या कर्जात बदल होतील का अशी विचारणा ग्राहकांकडून करण्यात येते आहे. याबद्दल बँकेने स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे की, ज्या व्याजदराने ग्राहकांनी कर्ज घेतले असेल तेच व्याजदर लागू राहतील, त्यात कुठलेही बदल केले जाणार नाहीत.