दिवाळीपूर्वी सोन्यात अभूतपूर्व उसळी; 10 ग्रॅमचा दर 1.20 लाखांच्या वर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी (7 ऑक्टोबर) सोन्याने इतिहासातील सर्वाधिक दर गाठत 10 ग्रॅमसाठी तब्बल ₹1,20,000 चा आकडा ओलांडला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली ही वाढ सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही या दरवाढीने चकित झाले आहेत.
Read More