Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm stock: पेटीएमचा स्टॉक 1000 रुपयांच्या पार जाणार? काय सांगतो 'हा' रिपोर्ट?

Paytm stock: पेटीएमचा स्टॉक 1000 रुपयांच्या पार जाणार? काय सांगतो 'हा' रिपोर्ट?

Image Source : www.news18.com

Paytm stock: मागच्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. आता बीओएफए (BoFA) ही सहावी ब्रोकरेज फर्म आहे. या फर्मनं पेटीएमच्या स्टॉकवर 1,000 रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे.

पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्यूनिकेशन (One97 Communications) आहे. ही कंपनी बीएसई (Bombay stock exchange) आणि एनएसईवर (National stock exchange) लिस्टेड असलेली कंपनी आहे. बीओएफएनं स्टॉकवर 'बाय' व्ह्यूसह प्रति शेअर 1,020 रुपयांचं लक्ष्य दिलं आहे. गुरुवारच्या (22 जून) तेजीनंतर या शेअरवर आपल्या टार्गेटला पुन्हा एकदा रिवाइज केलं आहे. बीओएफएसह 13 पैकी 6 विश्लेषकांनी पेटीएमवर प्रति शेअर 1,000 रुपयांपेक्षा जास्तीचं टार्गेट दिलं आहे. यासोबतच या स्टॉकला ट्रॅक करणाऱ्या 13 पैकी 11 अ‍ॅनालिस्टनी या शेअरवर खरेदीचं मत दिलं आहे. सीएनबीसीनं हे वृत्त दिलं आहे.

या वर्षी आतापर्यंत 60 टक्के वाढ

बीओएफएच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाच्या गतीमध्ये झालेल्या सुधारणेमुळे, स्टॉकमुळे 2023मध्ये आतापर्यंत शेअर जवळपास 60 टक्के वाढ झाली आहे. तसंच या समभागाची किंमत 2,150 रुपये प्रति शेअर या आयपीओ किंमतीपेक्षा खूपच कमी आहे.

3-4 तिमाहीत हीच स्थिती

ब्रोकरेज फर्मनं म्हटलं आहे, की जास्त मार्जिन असणारे लेंडिंग व्यवसाय आणि साउंडबॉक्ससारखे व्यवसाय यात चांगला मोमेंटम आहे. हे 3-4 तिमाहीत चांगलं राहणार आहे. शेअरमधली गती पाहता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता ब्रोकरेज फर्मनं व्यक्त केली आहे. ब्रोकरेज फर्मनं आपली प्रति शेअर कमाई आर्थिक वर्ष 2025साठी 3.86 रुपये आणि आर्थिक वर्ष 2026साठी 5.29 रुपये केली आहे.

एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढलं लक्ष्य

फोनपेच्या (PhonePe) आयपीओ आणि जिओ फायनान्स सर्व्हिसेसच्या (Jio Financial Services) लिस्टिंगवर लक्ष ठेवण्याचा सल्ला बीओएफएनं गुंतवणूकदारांना दिला आहे. जून 2023मध्येच, बीओएफएनं पेटीएमवर रेटिंग अपग्रेड करून खरेदी करण्यासाठीचा सल्ला दिला होता. तसंच टार्गेटदेखील 780 रुपये प्रति शेअर वाढवून 855 रुपये प्रति शेअर केलं होतं.

पेटीएम स्टॉकसाठी पॉझिटिव्ह ट्रिगर

पेटीएमचे ऑपरेशन लीव्हरेज आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि मर्यादित स्पर्धेमुळे कंपनीला चांगली संधी आहे, असं ब्रोकरेज फर्मनं सांगितलं होतं. डिजिटलायझेशनमुळे पेमेंटमध्ये वाढ झाली असून कंपनीची रोख रक्कमही मजबूत आहे. हे सर्व ट्रिगर पेटीएम स्टॉकसाठी सकारात्मक ट्रिगर आहेत. पेटीएमच्या मे महिन्याच्या बिझनेस अपडेटनुसार, पेटीएमचं लोन डिस्बर्सल गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत 50 टक्के वाढलं आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजता पेटीएमचे शेअर्स एनएसईवर 1.75 टक्क्यांनी घसरून 850.50 रुपये प्रति शेअर आणि बीएसईवर 1.83 टक्क्यांनी घसरून 850.10 रुपये प्रति शेअरवर ट्रेडिंग करत होते.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)