ब्लू चिप स्टॉक्स हे खरं तर महत्त्वाचे असतात. कारण याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही (Economy) परिणाम होत असतो. हे स्टॉक्स मोठ्या कंपन्यांचे असतात. या कंपन्यांची उत्पादनं आणि सेवा बाजारात सर्वोत्तम मानल्या जातात. अशी कंपन्यांची विश्वासार्हता (Credibility) ही शेअर बाजार (Share market) आणि इतर खुल्या बाजारात अत्यंत मजबूत अशी असते. या कंपन्यांचं व्यवस्थापन (Management) इतर कंपन्यांपेक्षा अत्यंत चांगलं असतं. त्यातूनच ब्लू चिप स्टॉक्सचं महत्त्व अधोरेखित होतं.
Table of contents [Show]
- ब्लू चिप स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे फायदे
- स्थिरता (Stability)
- गुंतवणुकीचा विश्वसनीय पर्याय (A reliable investment option)
- मुख्य निर्देशांकांमध्ये लिस्ट (Listed in key indexes)
- आपल्या क्षेत्रातल्या लिडिंग कंपन्या (Leading companies in your field)
- सौदेबाजीची शक्ती (Bargaining power)
- आर्थिक ताकद (Financial strength)
- बाजारातले चढउतार सहन करण्याची क्षमता (Ability to withstand market fluctuations)
- सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड (Consistent track record)
- कमी जोखीम गुंतवणूक (Low risk investment)
- ब्लू चिप समभागांमध्ये अस्थिरतेचा अभाव (Lack of volatility)
ब्लू चिप स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे फायदे
ब्लू चिप हा शब्द पोकरच्या खेळातून आला आहे. निळ्या चिप्सचं मूल्य तिथं सर्वाधिक असतं. ब्लू चिप कंपन्यांचे शेअर्स अत्यंत दर्जेदार मानले जातात. टीव्ही 9नं याचा आढावा घेतला आहे. ब्लू चिप स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे काय काय फायदे आहेत ते आता पाहू...
स्थिरता (Stability)
सामान्यपणे असे स्टॉक्स उद्योग आणि अर्थव्यवस्थेतील इतर समभागांच्या तुलनेत आर्थिक मंदीचा चांगला सामना करण्याची क्षमता ठेवतात. तसंच महत्त्वाचं म्हणजे स्थिर राहतात.
गुंतवणुकीचा विश्वसनीय पर्याय (A reliable investment option)
मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांच्या समभागांपेक्षा असे स्टॉक्स जास्त सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय मानले जातात.
मुख्य निर्देशांकांमध्ये लिस्ट (Listed in key indexes)
देशातल्या प्रमुख आणि मोठ्या कंपन्या सेन्सेक्स आणि निफ्टी यासारख्या शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये लिस्टेड आहेत. सेन्सेक्स 30 आणि निफ्टी 100मध्ये तुम्हाला अशा कंपन्यांची नावं सापडू शकतात. या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस (TCS), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचयूएल (HUL) यांचा समावेश आहे. सध्या, हे शेअर्स प्रमुख निर्देशांक आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा कणा बनले आहेत.
आपल्या क्षेत्रातल्या लिडिंग कंपन्या (Leading companies in your field)
ब्लू-चिप स्टॉक्सचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लीडर किंवा अग्रगण्य म्हणून असलेली त्यांची स्थिती होय. या कंपन्या त्यांच्या उद्योगातल्या सर्वोत्तम उत्पादन किंवा सेवा देण्यासाठी ओळखल्या जातात. अशा कंपन्यांचा बाजारातला हिस्साही इतर कंपन्यांपेक्षा जास्त असतो. यामुळे या कंपन्या ग्राहकांमध्ये मजबूत ब्रँड म्हणून ओळखीच्या रूपात असतात.
ब्लू चिप स्टॉक कंपन्यांमध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक सौदेबाजीची शक्ती म्हणजेच बार्गेनिंग पॉवर असते. याचं कारण संबंधित क्षेत्रातल्या कंपनीची मक्तेदारी. या कारणास्तव या कंपन्या खंबीरपणे व्यवहार करत असतात. त्यामुळे अशा कंपन्यांचा महसूलदेखील वाढतो.
आर्थिक ताकद (Financial strength)
कमी कर्ज, कमी खेळतं भांडवल, हेल्थी बॅलन्स शीट आणि पुरेशी रोख राखीव यामुळे अशा कंपन्यांची आर्थिक ताकद सर्वसामान्यपणे मजबूत असते. ही आर्थिक स्थिरता त्यांना आरअँडडी (R&D), भांडवली खर्च (Capital expenditure), मजबूत विपणन (Strong marketing) करण्यास मदत करते.
बाजारातले चढउतार सहन करण्याची क्षमता (Ability to withstand market fluctuations)
विवेकपूर्ण ऐतिहासिक कामगिरी पाहिल्यास, बाजारातल्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील गुंतवणूकदार अशा समभागांमध्ये निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकतात. ते सहसा बाजारातल्या चढउतारांना इतर कंपन्यांपेक्षा बाजारातल्या अस्थिरतेच्या वेळी अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात. बाजारातली गडबड किंवा आर्थिक मंदीच्या काळातसुद्धा ते अनेकदा मजबूत होत असतात.
सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड (Consistent track record)
ब्लू चिप स्टॉक्सचा आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भागधारकांना उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्त्रोत यामाध्यमातून मिळत असतो. महत्त्वपूर्ण आणि नियमित लाभांश देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड असतो. लाभांश पेआउटमधली ही स्थिरता गुंतवणूकदारांसाठी या समभागांचं आकर्षण वाढवत असते.
कमी जोखीम गुंतवणूक (Low risk investment)
सामान्यपणे ब्लू चिप कंपन्यांना कमी जोखीम गुंतवणुकीच्या प्रकारात ठेवलं जातं. जोखीम हा मुख्य घटक आहे, जो लोकांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापासून थांबवतो. बाजारातल्या अस्थिरतेबद्दल काळजी वाटणाऱ्यांना ब्लू चीप स्टॉक्स आकर्षित करतात. गुंतवणूकदारांच्या असंख्य संख्येमुळे त्यांची मागणी आणि पुरवठा नेहमीच जास्त असतो.
ब्लू चिप समभागांमध्ये अस्थिरतेचा अभाव (Lack of volatility)
ब्रॉड मार्केटच्या तुलनेत ब्लू चिप्स कंपन्या कमी अस्थिर आहेत. पुरेशा तरलतेमुळे, गुंतवणूकदार कोणत्याही वेळी खरेदी आणि विक्री करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे मागणी आणि बोली दरांमधील कमी फरकामुळे व्यवहाराची किंमत खूपच कमी होते.