ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनं (Oriental Rail Infra Limited) गेल्या 19 वर्षांत स्टॉक मार्केटमध्ये (Stock market) 21 पैशांनी काम सुरू केलं होतं. त्यांनी 69 रुपयांच्या पातळीपर्यंत 32700 टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 4 फेब्रुवारी 2014ला ओरिएंटल रेल इन्फ्राचे शेअर्स 6.80 रुपयांच्या पातळीवर होते. यानंतरच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 10 पट वाढ झाली. 30 डिसेंबर 2016रोजी ओरिएंटल रेल इन्फ्राचे शेअर्स 19.65 रुपयांच्या पातळीवर होते. त्यानंतर आतापर्यंत गुंतवणूकदारांची संपत्ती 3 पटीनं वाढली आहे.
Table of contents [Show]
भारतीय रेल्वेसाठी विविध कामं
ओरिएंटल रेल इन्फ्रा लिमिटेडचे शेअर्स 22 मे 2020 रोजी 28 रुपयांपर्यंत खाली गेले होते. त्यावेळी गुंतवणूकदारांना आतापर्यंत 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. भारतीय रेल्वेसाठी विविध कामं करणार्या ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी बीएससीच्या सर्वाधिक लाभधारकांमध्ये होते.
शेअर्स अप्पर सर्किटला...
गेल्या शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडकल्यानंतर ओरिएंटल रेल इन्फ्राचे शेअर्स 65.52 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये शुक्रवारी 2.21 पट वाढ झाली. ओरिएंटल रेल इन्फ्रा लिमिटेडचे शेअर्स बर्याच काळापासून सतत अप्पर सर्किटला धडकत आहेत. सोमवारच्या सुरुवातीच्या व्यापाराबद्दल बोललो तर ओरिएंटल रेल इन्फ्राचे शेअर्स पुन्हा 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर होते आणि 68.79 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.
त्रैमासिक निकाल जाहीर
ओरिएंटल रेल इन्फ्रानं एक उत्कृष्ट त्रैमासिक निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर त्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. ओरिएंटल रेल इन्फ्राची विक्री आणि निव्वळ नफा चांगला नोंदवत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ओरिएंटल रेलच्या विक्रीत 131 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर निव्वळ नफ्यात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कंपनीकडे 1430 कोटी रुपयांच्या ऑर्डर
ओरिएंटल रेल इन्फ्रानं म्हटले आहे, की कंपनीसह तिच्या सहयोगी कंपनीकडे सध्या 1430 कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. ओरिएंटल रेल इन्फ्रा लिमिटेड रेल्वेसाठी अनेक प्रकारची कामं करते. त्यात सीट, बर्थ आणि संबंधित उत्पादनं यांचा समावेश आहे. ओरिएंटल रेल इन्फ्रा लिमिटेडचं मार्केट कॅप 353 कोटी रुपये आहे. तुम्हाला या कंपनीच्या शेअर्सवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण मागच्या 15 दिवसांत गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा कंपनीनं दिला आहे. तर महिन्याभरात 50 टक्क्यांचा परतावा दिला.