अतुल ऑटो लिमिटेड (Atul auto limited) या स्टॉकमध्ये विजय केडिया यांनी त्यांचा हिस्सा वाढवला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये (Shares) आज मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अतुल ऑटो लिमिटेडचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. बाजारातलं वातावरण तितकं प्रभावी नाही. मात्र असं असतानाही अतुल ऑटो लिमिटेडचे शेअर्स 9.76 टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर स्टॉकच्या व्हॉल्यूममध्ये 2.43 पटपेक्षा जास्त वाढ दिसून येत आहे. समभागातल्या तेजीचं श्रेय दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया (Vijay Kedia) यांच्या प्रभावशाली सहभागालाही दिलं जात आहे.
केडियांनी कंपनीतला हिस्सा वाढवला
विजय केडिया यांनी एप्रिल ते जून 2023च्या दरम्यान अतुल ऑटोमध्ये आपला स्टेक 7.05 टक्क्यांवरून 13.70 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यांच्याकडे आता 35,69,024 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 13.70 टक्के आहे. शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2023) त्यांच्याकडे 16,83,502 शेअर्स होते, जे एकूण पेड-अप भांडवलाच्या 7.05 टक्क्यांच्या समानच आहे.
प्रभावशाली कामगिरी
अतुल ऑटो ही ऑटो रिक्षाची निर्माता आणि विक्रेता कंपनी आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीतर्फे सेवा दिली जाते. आर्थिक वर्ष 2022-2023मध्ये, अतुल ऑटोनं प्रभावी अशी आर्थिक कामगिरी केली आहे. कंपनीचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
Vijay Kedia portfolio: Atul Auto share price has risen from 174.50 to ₹335 apiece levels in the last one year. https://t.co/rnE7M0Nr4G
— Mint (@livemint) July 17, 2023
नफा किती?
अतुल ऑटो कंपनीचा एकूण महसूल मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 62.85 टक्क्यांवाढून 513 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय, ऑपरेटिंग प्रॉफिट 125 टक्क्यांनी वाढून 36 कोटी रुपये झाला आहे. तर निव्वळ नफा मागच्या वर्षाच्या तुलनेत 88 टक्क्यांनी वाढून 3 कोटी रुपये इतका झाला आहे. नफा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे शेअर्स समाविष्ट करू शकतात.