Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onion Prices : कांद्याच्या किंमती वाढल्या, भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज

महाराष्ट्रात सामान्यतः वडापाव आणि भेळीसोबत कांदा देण्याची पद्धत आहे. बहुतांश ठिकाणी भेळीसोबत तर कांदा दिलाच जातो. मात्र आता कांद्याच्या किमती वाढल्या असल्याने भेळ प्रेमींना कोरडीच भेळ खावी लागत आहे. आधीच तेल, बेसन पीठ आणि इतर जिन्नस महागल्याने भाववाढ झालेला कांदा सध्या वडापाव आणि भेळीतून गायब झाल्याचे पाहायला मिळते आहे.

Read More

Onion Procurement : शेतकऱ्यांना दिलासा!! NAFED करणार प्रति क्विंटल 2410 रुपये दराने कांद्याची खरेदी

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने राज्यातील तब्बल 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाफेड मार्फत हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध कांदा बाजारपेठामधून ही कांदा खरेदी केली जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.

Read More

Onion Economy In Lasalgaon: लासलगावचा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय! सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Onion Economy In Lasalgaon: सलग दुसऱ्या वर्षी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने इथला कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पुढल्या हंगामात कांद्याची शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.यासंदर्भात नुकताच महामनीच्या टीमने थेट लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याचे अर्थकारण जाणून घेतले.

Read More

Onion Subsidy: कांदा अनुदान मिळवण्यासाठी 'असा' करू शकता अर्ज

Onion Subsidy: कांद्याचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यांची परिस्थिती लक्षात घेता सरकारने त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल असे अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Onion Crisis : कांदा शेतकऱ्याला का रडवतोय?

Maharashtra Onion Crisis: कांद्याचा भाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय. अलीकडेच वाहतुकीचाही खर्च निघत नाही म्हणून एका शेतकऱ्याला 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाहीए. आणि वर निर्यातही थांबवीय. कांद्याच्या बाबतीत नेमकं काय घडतंय?

Read More

Onion Price: व्यथा बळीराजाची! औरंगाबादमधील शेतकऱ्यानं 70 गोणी कांदा उकिरड्यात फेकून दिला; विकून खर्चही निघेना

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी विष्णू घोडके हतबल झाले आहेत. त्यांनी स्वत: 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून दिला. एकरी 60 हजार रुपयापर्यंत खर्च करुन शेतकऱ्यावर कांदा फेकून देण्याची वेळ येत आहे. काही शेतकरी उभ्या पिकात नांगर फिरवत असल्याचेही विष्णू यांनी सांगितलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

Read More

Solapur onion farmer: शेतकऱ्याची क्रूर थट्टा! दहा पोते कांदे विकून हातात आले फक्त 2 रुपये

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 10 पोते कांदे विक्रीस आणले होते. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक हातात दिला.

Read More