Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Green Hydrogen policy : देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राकडून ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर; 8562 कोटींची मंजुरी

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणाला (Green Hydrogen policy) मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. तसेच या धोरणासाठी सरकारने तब्बल 8562 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या माध्यमातून राज्यात 65000 रोजगार निर्मिती होणार आहे.

Read More

Electricity tariff : दिवसा स्वस्त, रात्री महाग होणार वीज दर; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्रीय उर्जा मंत्रालयाने वीज दराच्या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना दिवसा वीज वापरल्यास कमी बिल आकारले जाईल. तसेच रात्रीच्यावेळी जेवढी वीज वापरली जाणार आहे. त्या विजेच्या दरामध्ये वाढ केली जाणार आहे. दिवसा वापरण्यात येणाऱ्या वीजचा दर हा 20% स्वस्त तर रात्रीचा वीज दर हा 20% महाग असणार आहे.

Read More

Minerals in The Sea: समुद्रात भारत सरकार शोधणार खनिजे, अर्थव्यवस्थेला मिळू शकते चालना

खाण मंत्रालय (Ministry of Mine) सागरी क्षेत्रातील महत्त्वाची खनिजे शोधण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे. इतर कोणत्याही पक्षाला या प्रक्रियेत रस नसल्यामुळे भारत सरकार या खनिज साठ्याचा लिलाव करणार आहे. उद्योगासाठी ही एक मोठी संधी असल्याचे वर्णन करताना खाण मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, 'हे पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे व्यवसाय ऑपरेशन असेल.'

Read More

Budget 2023 Update: आंतरराज्यीय एनर्जी ट्रान्समिशन प्रणाली उभारण्यासाठी, शासनाची 29 हजार कोटींची घोषणा

Budget 2023 Update: 29 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून लडाखमधून अक्षय ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि ग्रीड एकत्रीकरणासाठी आंतरराज्य पारेषण प्रणाली तयार केली जाणार आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प भारतात होणार आहे. सुरुवातीला लडाखमधील सोलार पार्कमधून हे ट्रान्समिशन हरियाणामध्ये केले जाणार आहे.

Read More

Budget 2023 Update: ऊर्जा संक्रमण आणि निव्वळ शून्य उद्दिष्टपूर्तीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Update: पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या दृष्टीने हरित वाढीवर लक्ष केंद्रीत करत, पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैली चळवळीला चालना देण्यासाठी, भारत पंचामृत योजना आणली आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनासाठी आणि ऊर्जा संक्रमण दृढपणे वाटचाल करण्याचे ध्येय आहे. यासाठीच शासनाने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

Read More

Hardeep Singh Puri: भारत 2040 पर्यंत जागतिक उर्जेच्या 25% गरजा पूर्ण करेल, दिली योजनेविषयी माहिती

Hardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले आहे की, 1973 च्या तेल संकटानंतर भारत जगातील सर्वात वाईट ऊर्जा संकटातून बाहेर पडू शकला आहे. याचे श्रेय ऊर्जा सुरक्षा धोरणाच्या चतु:सूत्री;ला जाते.

Read More

Rooftop Solar Scheme Extension: सौर योजनेला केंद्र सरकारची मुदतवाढ, घरगुती वीज ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होणार

Rooftop Solar Program: केंद्र सरकारने सौर योजनेला (Rooftop Solar Program) मुदतवाढ दिली आहे. आता सर्वसामान्यांना 31 मार्च 2026 पर्यंत या योजनेतील अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

Read More