घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करुन देणारी छपरावरील सौर योजनेला (Rooftop Solar Programme)31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नॅशनल पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
छपरावरील सौर योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सरकारने ही योजना आणखी चार वर्षे वाढवली आहे. घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा वापर करायचा असेल अशा ग्राहकांना सौर योजनेत सहभागी होता येणार आहे. नॅशनल पोर्टलवर नोंदणी केल्यास वीज कंपनीने अधिकृत न केलेल्या कोणत्याही एजंटला घरगुती वीज मीटर तपासणीसाठी शुल्क देऊ नये, असे आवाहन सरकारने ग्राहकांना केले आहे.
नॅशनल पोर्टलवर ग्राहकांना सौर पॅनलसाठी नोंदणी करता येईल. त्यांच्या अर्ज आणि प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आली आहे याचेही अपटेड घेता येणार आहे. त्यांनी सादर केलेल्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम हस्तांतर केली जाणार आहे. या योजनेत एका किलोवॅटसाठी सरकार 14588 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. रुफटॉप सोलार प्रोग्रॅमअंतर्गत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅट (3kw) क्षमतेची सौर यंत्रणा उभारता येईल. सौर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकारी वीज कंपन्यांनी काही विक्रेत्यांना मान्यता दिली आहे. अशा मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून सौर पॅनल खरेदी करावे लागतील.
National Portal वर करा नोंदणी
रुफटॉप सोलार स्किम जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र (National Portal) नॅशनल पोर्टल सुरु केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 जुलै 2022 रोजी नॅशनल पोर्टलचा शुभारंभ केला होता. नॅशनल पोर्टलवर सौर पॅनलचे मान्यताप्राप्त विक्रेत्यांचा तपशील आहे. नॅशनल पोर्टलवर ग्राहकांना निशुल्क नोंदणी करता येणार आहे. अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे.