Minerals in the Sea: अलीकडेच जम्मू-काश्मीरमध्ये असा खजिना सापडला आहे, जो देशाच्या अनेक गरजा भागवू शकतो. हा खजिना लिथियमचा असून जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे (Lithium found in Jammu Kashmir) साठे सापडले आहेत. त्याचबरोबर अशाच काही खजिन्याचा भारत सरकार समुद्रातही शोध घेत आहे. खरे तर, सरकार समुद्रातील खनिजे शोधत आहे. खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज (Vivek Bhardwaj) यांनी सांगितले की, सरकार सागरी क्षेत्रात निकेलसारख्या (Nickel) खनिजांचे साठे शोधत असून भविष्यात या ठेवींची विक्रीही केली जाईल. खाण मंत्रालयाने ऑफशोअर एरिया मिनरल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट, 2002 (Offshore Areas Mineral Development and Regulation Act 2002) मध्ये सुधारणा करण्यासाठी संबंधितांकडून मत मागवले आहे.
Table of contents [Show]
भारतात खनिजांचा साठा
भारद्वाज यांनी CII या उद्योग संस्थेच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले की, "अमूल्य अशा खनिजांचे महत्त्व अधिक वाढले असताना, आपण सागरी क्षेत्रात त्यांचे खाणकाम का करत नाही, असा विचार आता निर्माण झाला आहे. आपण सागरी उत्खनन करत नाही हे खरे तर दुर्दैवी आहे. आता आम्ही या कायद्यात सुधारणा करत आहोत आणि सर्व संबंधितांना या संदर्भात त्यांचे मत मांडता येईल."
भारताचे सागरी क्षेत्र
विवेक भारद्वाज म्हणाले की खाण मंत्रालय (Ministry of Mine) सागरी क्षेत्रातील महत्त्वाची खनिजे शोधण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे. इतर कोणत्याही पक्षाला या प्रक्रियेत रस नसल्यामुळे भारत सरकार या खनिज साठ्याचा लिलाव करणार आहे. उद्योगासाठी ही एक मोठी संधी असल्याचे वर्णन करताना खाण मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, "हे पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे व्यवसाय ऑपरेशन असेल."
स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान
तांबे, लिथियम, निकेल, कोबाल्ट आणि दुर्मिळ खनिजे आजच्या स्वच्छ ऊर्जा (Pure Energy) तंत्रज्ञानाच्या युगातील महत्त्वाचे घटक आहेत. ते पवनचक्कीपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत वापरले जातात. भारद्वाज म्हणाले की, भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी अल्युमिनियम आणि इतर धातूंचा पुनर्वापर (Recycling) करणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगांना 'रिसायकलिंग' उपक्रमात सहभागी होण्याची विनंतीही त्यांनी केली.
खनिज क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा!
भारत हा खनिज समृद्ध देश आहे ज्याच्या विविध भागांत खनिजे आढळतात. भारतात आढळणाऱ्या काही प्रमुख खनिजांमध्ये कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट, मॅंगनीज, क्रोमाईट, तांबे, शिसे आणि जस्त यांचा समावेश होतो. भारतातील खाण आणि खनिज क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण ते रोजगार प्रदान करते आणि देशाच्या निर्यात कमाईमध्ये देखील योगदान देते. भारत सरकारच्या खाण मंत्रालयानुसार, 2019-20 मध्ये भारतातील खनिज उत्पादनाचे मूल्य अंदाजे 2.78 ट्रिलियन भारतीय रुपये (सुमारे 37 अब्ज अमेरिकन डॉलर्स) इतके होते.
कोळसा हा भारतातील सर्वात मुबलक खनिज स्त्रोत आहे, कोळशाच्या साठ्याच्या बाबतीत देश जगात चौथ्या क्रमांकावर आहे. लोहखनिज हे देखील भारतातील एक प्रमुख खनिज स्त्रोत आहे आणि हा देश जगातील तिसरा सर्वात मोठा लोहखनिज उत्पादक देश आहे. अल्युमिनियमच्या उत्पादनासाठी मुख्य कच्चा माल असलेला बॉक्साईटचाही भारताकडे लक्षणीय साठा आहे.
भारताचे खनिज क्षेत्र भारत सरकारच्या खाण मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते, जे देशातील खाण क्षेत्राचा विकास आणि नियमन करण्यासाठी धोरणे आणि नियम तयार करण्यासाठी जबाबदार आहे. राष्ट्रीय खनिज धोरण 2019 ची अंमलबजावणी आणि खनिज कायदा (सुधारणा) कायदा 2020 लागू करणे यासह खनिज क्षेत्राच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.परंतु, बेकायदेशीर खाणकाम आणि नियमांची अपुरी अंमलबजावणी झाल्याच्या अहवालांसह, भारतातील खणीकर्माबद्दल आणि पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आदिवासी भागातील खनिज संपत्तीच्या शोषणावरही वेळोवेळी चिंता व्यक्त केली गेली आहे, ज्यामुळे काही प्रदेशांमध्ये वारंवार निषेध, मोर्चे केले जात आहे.
समुद्रातील खनिज साठा!
पॉलिमेटॅलिक नोड्यूल (Polymetallic Nodule) , कोबाल्ट-रिच क्रस्ट्स (Cobalt Rich Crusts) आणि सीफ्लोर मॅसिव्ह सल्फाइड्स (Seafloor Massive Sulfides) यांसारख्या खनिजांच्या महत्त्वपूर्ण साठ्यांसह हिंदी महासागर खनिज संसाधनांनी समृद्ध म्हणून ओळखला जातो. ही खनिज संसाधने समुद्रकिनारी असलेल्या देशांच्या अनन्य आर्थिक क्षेत्राच्या (Exclusive Economic Zone) पलीकडे खोल समुद्रात आढळतात आणि समुद्राच्या कायद्यावरील संयुक्त राष्ट्राच्या United Nations Convention on the Law of the Sea करारानुसार (UNCLOS) आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण, International Seabed Authority (ISA) द्वारे शासित आहेत.
भारत, ISA चा सदस्य म्हणून, हिंदी महासागरात खोल समुद्रातील खाणकामाच्या शक्यतांचा सध्या शोध घेत आहे. देशाच्या भूविज्ञान मंत्रालयाने हिंदी महासागरातील खोल समुद्रातील खनिज संसाधनांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत. 2020 मध्ये, भारताने मध्य हिंदी महासागर खोऱ्यातील पॉलिमेटॅलिक नोड्यूलच्या शोधासाठी ISA सोबत 15 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. पॉलिमेटॅलिक नोड्यूल खोल समुद्रात आढळतात आणि त्यात मॅंगनीज, निकेल, तांबे आणि कोबाल्ट यांसारखी खनिजे असतात. कोबाल्ट-रिच क्रस्ट्स समुद्री पर्वताच्या आसपासच्या भागात आढळतात आणि त्यात कोबाल्ट अधिक प्रमाणात असते, हे इलेक्ट्रिक वाहन बॅटरीच्या (Electric Vehicle Battery) उत्पादनात वापरले जाणारे एक महत्त्वपूर्ण खनिज आहे.
खोल समुद्रातील खाणकाम हे तुलनेने नवीन आणि गुंतागुंतीची क्रिया आहे ज्यामध्ये महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा समावेश आहे. सागरी पर्यावरणावर खोल-समुद्रातील खाणकामाच्या संभाव्य परिणामांबद्दल जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ज्यामध्ये समुद्रावरील अधिवासांचा नाश आणि विषारी प्रदूषके (Toxic Pollutants) सोडणे समाविष्ट आहे. खोल समुद्रातील खाणकामाची गरज व त्याचे नियमन आणि व्यवस्थापनासाठी उत्तम पर्याय शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत.