Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahila Samman Yojana: महिलांसाठी खुशखबर! काल पासून महिलांना मिळतेय एसटी प्रवास भाड्यात 50% सूट..

Mahila Samman Yojana: 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 % सवलत देण्यास सुरवात केली आहे. या सवलतीची compensatory शासनाकडुन करण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Budget 2023-24: राज्यातील प्रत्येक नागरिकावर 56 हजारांचे कर्ज!

Maharashtra Budget 2023-24: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यावर सुमारे 7,07,472 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसून आले आहे. याचे राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाशी प्रमाण जवळपास 18 टक्के इतके आहे.

Read More

Lek Ladki Yojna: जन-सामान्यांना सरकारची भेट, आता मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये

Maharashtra Government Lek Ladki Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमार्फत पात्र मुलींना 75 हजार रुपये इतकी रक्कम रोख मिळणार आहेत. 'लेक लाडकी योजना' या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Read More

Maharashtra Ration Update: केशरी रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य न देता पैसे देण्याचा शासनाचा निर्णय…..

Maharashtra Ration Update: मागील काही दिवसात जनतेला मोफत अन्न देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली होती. त्यातच आता महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अन्नधान्य न देता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Managing Finance After Death of Husband: विधवांसाठी पेन्शन देणाऱ्या योजना कुठल्या?

Managing Finance After Death of Husband : पतीचा अचानक मृत्यू झाला आणि स्त्री कमावती नसेल तर तिच्यावरचं संकट दुहेरी असतं. एक तर उर्वरित आयुष्य एकट्याने काढायचं आणि दुसरं म्हणजे घरातला कमाईचा स्त्रोत कमी झालेला असतो. अशावेळी विधवा महिलेच्या आयुष्याला आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारच्या काही पेन्शन योजना आहेत तुम्हाला माहीत आहेत?

Read More

Maharashtra Cabinet Decisions: गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त सरकार देणार 100 रुपयांत शिधा

Maharashtra Cabinet Decisions: शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वी 100 रुपयांत आनंदाचा शिधा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Chief Minister Fellowship Scheme: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना, 'असा' करा अर्ज

Chief Minister Fellowship Scheme: मुख्यमंत्री फेलोशिप योजना हा उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र, भारत सरकारने सुरू केलेला एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे.

Read More

Gatai Stall Scheme: माहित करून घ्या, चर्मकार बांधवांसाठी असलेल्या गटई स्टॉल योजनेबद्दल!

Gatai Stall Scheme: महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी अनेक योजना राबवित असतात. त्यापैकी एक म्हणजे गटई स्टॉल योजना. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरवात केली आहे.

Read More

Konkan Farmer: काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय, कोकणातील शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

Konkan Farmer: आंब्याची आवक लवकरच सुरू होणार आहे. सगळ्यांना लवकरच आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने (State Govt) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा कोकण भागाला मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना काजू उत्पादन आणि विक्रीसाठी मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

Read More

Maha DBT Farmer Subsidy Scheme: जाणून घ्या, महाडीबीटी शेतकरी अनुदान योजनेबद्दल!

Maha DBT Farmer Subsidy Scheme: जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असाल आणि शेतीमध्ये सातत्याने नुकसान होत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) तुमच्यासाठी राज्य स्तरावर महा डीबीटी शेतकरी योजना सुरू केली आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया..

Read More

Maharashtra DBT Scheme 2023: 20 लाख राशन कार्ड धारकांना मिळणार धान्यासाठी अनुदान..

Maharashtra DBT Scheme 2023: महाराष्ट्र सरकारने लोकांना अन्न अनुदानाऐवजी रोख रक्कम देण्यासाठी “(Direct Benefit Transfer Scheme)” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकार सर्व रेशन कार्ड धारकांना प्रायोगिक तत्त्वावर बाजारातून धान्य खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देईल.

Read More

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 9 मार्चला तर आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्चला होणार सादर

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ते 25 मार्च, 2023 पर्यंत चालणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read More