Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 9 मार्चला तर आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्चला होणार सादर

Maharashtra Budget 2023

Image Source : www.skyscrapercenter.com

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ते 25 मार्च, 2023 पर्यंत चालणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

Maharashtra Budget 2023 Date & Time: महाराष्ट्राचे या वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) 27 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) 9 मार्च या दिवशी मांडला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडतील. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

8 मार्चला आर्थिक पाहणी अहवाल मांडणार

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी विधिमंडळात आर्थिक पाहणी (Economic Survey of Maharashtra) अहवाल मांडला जातो. हा अहवाल 8 मार्च रोजी मांडला जाणार आहे. आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे राज्याच्या चालू आर्थिक वर्षातील घडामोडींचा लेखाजोखा मानला जातो. यात राज्याची आर्थिक परिस्थिती, राज्यावरील कर्जे, दायित्वे, विविध विभागांनी राबवलेल्या योजनांची प्रगती, त्यावरील खर्च, लाभार्थी अशी इत्यंभूत आकडेवारी दिलेली असते. या अहवालाला मिनी बजेट किंवा राज्याचे मागील वर्षाचे प्रगतीपुस्तक म्हटले जाते.

अर्थसंकल्पात नागरिकांच्या सूचनांचा समावेश करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नागरिकांच्या मनातील योजना आणि त्यांना हव्या असलेल्या घटकांचा समावेश करण्यासाठी, थेट नागरिकांकडूनच सूचना मागवण्यात आल्या आहेत. या सूचना देवेंद्र फडणवीस यांच्या वेबसाईटवरील फॉर्मद्वारे पाठवता येऊ शकतात.

राज्यपालांचे अभिभाषण

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais, Governor of Maharashtra) हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना मार्गदर्शन केले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राज्यापालांतर्फे सादर होणाऱ्या भाषणाला अभिभाषण म्हटले जाते. अभिभाषणाद्वारे राज्यपाल सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतात.

विधिमंडळाच्या संकेतस्थळावर अर्थसंकल्पाचे Live प्रक्षेपण

महाराष्ट्र विधिमंडळाच्या संकेतस्थळावर संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहता येणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे म्हणजे विधानसभा आणि विधानपरिषदेच्या YouTube चॅनेलवर पाहता येणार आहे.

FAQ on Maharashtra Budget 2023

बजेट कोणत्या तारखेला सादर होणार?

महाराष्ट्राचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर केला जाईल.

बजेटची वेळ काय असेल?

राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात दुपारी 2.00 वाजता सादर केला जातो.

बजेट कोण सादर करणार?

महाराष्ट्राचा 2023-24 चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सादर करतील.

मागील वर्षाचे बजेट कोणी सादर केले होते?

2022-2023 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलाा होता.

2022-23 या वर्षाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान काय होते?

2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प 5 लाख 48 हजार 407 कोटी रुपयांचा होता.

2022-23 मध्ये किती रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या?

2022-23 या आर्थिक वर्षात तीनवेळा पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या तिन्ही अधिवेशनात एकूण 84 हजार 538 कोटी 50 लाखांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या.

2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किती पुरवणी मागण्या करण्यात आल्या?

2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 हजार 383 कोटी 97 लाखांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यात 5 लाख 977 कोटी 40 लाखांच्या पुरवणी मागण्या या महसुली तर फक्त 406 कोटी 56 लाखांच्या पुरवणी मागण्या या भांडवली स्वरूपाच्या आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प Live कोठे पाहता येईल?

राज्याच्या विधिमंडळाची संसदेनुसार दोन सभागृह आहेत. एक विधानसभा आणि दुसरी विधानपरिषद. प्रचलित परंपरा आणि नियमानुसार राज्याचे अर्थमंत्री हे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतात. तर राज्याचे अर्थ राज्यमंत्री हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतात. सध्याच्या सरकारने अद्याप राज्यमंत्र्यांची नेमणून न केल्यामुळे कॅबिनेटमधीलच एक मंत्री विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प राज्यातील नागरिकांना लाईव्ह पाहता येतो. तशी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विधानसभेतील अर्थसंकल्प नागरिकांना विधानसभा Live प्रक्षेपण  या युट्यूब चॅनेलवरून पाहता येईल. तर विधानपरिषदेतील अर्थसंकल्पाची चर्चा  व इतर कामकाज विधानपरिषद Live प्रक्षेपण या युट्यूब चॅनेलवरून पाहता येईल.