Maharashtra Ration Update: केंद्र आणि राज्यसरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मागील काही दिवसात जनतेला मोफत अन्न देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली होती. त्यातच आता महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अन्नधान्य न देता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्नधान्य न देता पैसे देण्याचा शासनाचा निर्णय…..
| औरंगाबाद | हिंगोली | 
| जालना | अमरावती | 
| नांदेड | वाशिम | 
| बीड | अकोला | 
| उस्मानाबाद | बुलढाणा | 
| परभणी | यवतमाळ | 
| लातूर | वर्धा | 
महाराष्ट्रातील वरील 14 जिल्ह्यांना अन्नधान्य न देता त्याऐवजी 150 रुपये देण्यात येणार आहे. आता घरातील रेशन कार्ड हे महिलांच्या नावावर असल्याने हे पैसे देखील त्यांच्याच अकाऊंटला जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड बँक अकाऊंटसोबत लिंक असणे आवश्यक आहे. ही सुविधा APL म्हणजेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी आहे. 28 फेब्रुवारीला या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
तीन प्रकारचे कार्ड ग्राहकांना दिले जाते. पिवळं, केशरी, पांढर. यातील पिवळं कार्ड हे अंतोदय म्हणजेच बीपीएलचे असते. केशरी कार्ड हे APL चे असते. केशरी कार्डधारकांना दरमहा 5 किलो धान्य दिले जात होते. त्यात 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ.
(Food and Supplies Department of State Govt) वेबसाईटनुसार, पिवळ्या रंगाचं रेशनकार्ड वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या कुटुंबाला दिले जाते. यालाच BPL दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी म्हणतात. ज्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख आहे अशा कुटुंबाला पांढरं रेशन कार्ड दिले जाते.
धान्य ऐवजी पैसे मिळवण्यासाठी अर्ज…
शासनाने या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया केली आहे. ऑफलाइनसाठी फॉर्म PDF डाऊनलोड करावी लागेल. त्यांनंतर तो फॉर्म व्यवस्थित भरून त्याला कागदपत्रे जोडावे लागेल. या सर्व अर्जाची छाननी करून तहसिलदार कडून यादी जाहीर केली जाईल. मृत व्यक्तीचे नाव त्यातुन हटवण्यात येईल. त्याच बरोबर अपात्र असलेल्या ग्राहकांचे रेशन सुद्धा बंद करण्यात येणार आहे.
योजनेची अमलबजावणी…..
14 जिल्ह्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजून या योजनेला सुरवात झालेली नाही. उदा. अमरावती जिल्ह्यामध्ये ग्राहक अजूनही धान्य घेत आहे. या योजनेबाबत बहुतेक लोकांना अजूनही माहिती नाही. काही लोकांना याबाबत विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की….…..
पैसे न देता धान्यच दिले पाहिजे. आम्हाला सोईस्कर होते, काहींच्या घरी पुरुष दारू पित असल्याने ते पैसे घरापर्यंत येतील की नाही याचीही गॅरंटी नाही. धान्य मिळाले की ते आम्ही घरी आणून मुला बाळांचा सांभाळ करतो. असे अमरावती जिल्ह्यातील वाडेगाव येथील महिलांनी महामनीशी बोलतांना सांगितले.
परभणी येथील अजय भुजबळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुद्धा हेच सांगितले की आजून पर्यंत तरी याबाबत आमच्याकडे काही माहिती नाही. पण सरकारने जर धान्यच दिले तर बरे होईल, रेशन सेंटर मधून धान्य लगेच आम्ही घरी घेऊन येऊ शकतो. काही नजीकच्या काही गावांमध्ये बँक नसते मग त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे सरकारने वृद्ध लोकांसाठी तरी हा निर्णय बदलला पाहिजे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            