Gatai Stall Scheme: महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी अनेक योजना राबवित असतात. त्यापैकी एक म्हणजे गटई स्टॉल योजना. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरवात केली आहे.
अनेक वेळ आपण बघतो की, चामड्याच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्त करून देणारे लोकं एखादी जागा बघून आपले स्टॉल लावतात आणि उन्हातान्हात बसतात. कधी कधी टर रस्त्याच्या कडेला सुद्धा बसलेले दिसतात. पाऊस, ऊन, वारा यामुळे अनेकदा यांच्या धंद्याचे नुकसान होतांना दिसते. या व्यावसायिकांना ऊन, वारा व पाऊस यांपासून संरक्षण मिळण्यासाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहायक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना 1997 सुरू करण्यात आली आणि 2013 मध्ये गटई स्टॉल पुरवठ्याबाबतची कार्यवाही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येऊ लागली.
Table of contents [Show]
- गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय? (What is the purpose of Gatai Stall Scheme?)
- गटई स्टॉल योजनेचे लाभ व लाभार्थी (Benefits and Beneficiaries of Gatai Stall Yojana)
- गटई स्टॉल योजनेसाठी आवश्यक पात्रता (Eligibility Required for Gatai Stall Scheme)
- गटई स्टॉल योजेनच्या अटी (Terms of Gatai Stall yojna)
- गटई स्टॉल योजनेसाठी कागदपत्रे (Documents for Gatai Stall Scheme)
- गटई स्टॉल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत (Application Procedure for Gatai Stall Scheme)
गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय? (What is the purpose of Gatai Stall Scheme?)
- चर्मकार समाजाला चर्म उद्योग करण्यासाठी एखादे हक्काचे स्थान मिळावे,
- या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने गटई स्टॉल योजनेची सुरुवात केली आहे.
- दारिद्र रेषेखालील अनुसूचित जाती चर्मकार समुदायांचे जीवन उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- चर्मकार समाजाचे जीवनमान सुधारणे
- राज्यातील चर्मकार लोकांचा सामाजिक, आर्थिक विकास करणे
- त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
- गटई कामगारांना स्टॉल बांधण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागु नये,
- तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची,
- आवश्यकता भासू नये या उद्देशाने गटई कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- गटई कामगारांचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावे हा गटई कामगार योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- गटई कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे.
गटई स्टॉल योजनेचे लाभ व लाभार्थी (Benefits and Beneficiaries of Gatai Stall Yojana)
राज्यातील चर्मकार समाजातील गट कामगार गटई स्टॉल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या लोकांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल आणि 5000रुपये रोख अनुदान देण्यात येते.
- चर्मकार बांधवाना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्यास मदत होते.
- चर्मकार बांधवांना गटई स्टॉल सोबत अधिकृत परवाना सुद्धा दिला जातो.
- या योजनेमुळे चर्मकार बांधवांचे उन वारा व पावसापासून संरक्षण होते कारण स्टॉल त्यांना उन, वारा आणि पावसापासून आश्रय देतात.
- चर्मकार बांधवांना स्टॉल बांधण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही
- तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
गटई स्टॉल योजनेसाठी आवश्यक पात्रता (Eligibility Required for Gatai Stall Scheme)
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
- गटई स्टॉल योजनेसाठी फक्त चर्मकार समाजाचे बांधव पात्र असतील
गटई स्टॉल योजेनच्या अटी (Terms of Gatai Stall yojna)
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 50 वर्षापर्यंत असावे.
- अर्जदाराने ज्या व्यवसायाची निवड केली असेल त्या व्यवसायाचे त्याला संपूर्ण ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98 हजार,
- व शहरी भागासाठी रुपये एक लाख वीस हजार पर्यंत असणे आवश्यक आहे. राज्य शासन
- पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रुपये एक लाख पर्यंत असणे आवश्यक आहे.
- या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे,
- व जातीचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे,
- व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
गटई स्टॉल योजनेसाठी कागदपत्रे (Documents for Gatai Stall Scheme)
- आधार कार्ड (Aadhar Card)
- राशन कार्ड (Ration card)
- रहिवाशी दाखला (Resident Certificate)
- मोबाईल नंबर (mobile number)
- ई-मेल आयडी (Email Id)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport size photograph)
- अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate of the applicant)
- उत्पन्नाचा दाखला (Proof of income)
- अर्जदार अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook Xerox)
गटई स्टॉल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत (Application Procedure for Gatai Stall Scheme)
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन गटई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक अशी कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल. अर्ज जमा केल्याची पोच पावती घेणे आवश्यक आहे.