Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Cabinet Decisions: गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त सरकार देणार 100 रुपयांत शिधा

Maharashtra Cabinet Decisions

Maharashtra Cabinet Decisions: शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वी 100 रुपयांत आनंदाचा शिधा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वी 100 रुपयांत आनंदाचा शिधा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी दिला जाणार आहे. हा शिधा ई-पासद्वारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे. ई-पासाची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.