राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमार्फत पात्र मुलींना 75 हजार रुपये इतकी रक्कम रोख मिळणार आहेत. 'लेक लाडकी योजना' या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या 2023-2024 च्या अर्थसंकल्पात केली आहे.
राज्याचा 2023-2024 चा अर्थसंकल्प गुरुवारी येथे सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार मुली आणि महिलांच्या आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि इतरांसाठी अनेक उपाययोजना राबवणार आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत तसेच, या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
मुलींना कसा होईल फायदा ? (How will Girls benefit?)
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. यामध्ये पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर 5000 रुपये, इयत्ता चौथीला 4000 रुपये, इयत्ता सहावीला 6000 रुपये आणि इयत्ता 11वीला 8000 रुपये दिले जातील. लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला 75,000 रुपये रोख दिले जातील.
महिलांसाठी एसटी प्रवास निम्म्या दरात (ST travel for women at half rate)
तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत महिलांना दिली जाणार आहे. महिला खरेदीदारांना घर खरेदी करताना 1 टक्के सूट देण्यात आली आहे. सध्याच्या अटींनुसार, महिला 15 वर्षांपर्यंत पुरुष खरेदीदाराला घर विकू शकत नाही. ही अट शिथिल करून इतर सवलती दिल्या जातील.
आशा गटाच्या स्वयंसेविका व प्रवर्तकांचे मानधन 1500 रुपये, अंगणवाडी सेविकांचे 10 हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे 7200 रुपये आणि अंगणवाडी सहाय्यकांचे मानधन 5500 रुपये करण्याबरोबरच एकूण 20 हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
अर्थमंत्र्यांनी केली या योजनांची घोषणा (Finance Minister announced these schemes)
- मुद्रांक शुल्कात महिलांना 1 टक्के सूट
- बचत गटातील महिलांना 37 लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात आले
- बचत गटासाठी केंद्राने घोषित केल्याप्रमाणे मुंबई शहरात युनिटी मॉलची स्थापना
- एसटी भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत
- आशा स्वयंसेवकांचे मानधन सध्या 3500 रुपये इतके आहे. यामध्ये 1500 रुपयांची वाढ केली जाणार आहे.