Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पेन्शन योजना

National Pension System: केंद्र सरकार नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये बदल करणार, समितीची केली स्थापना

National Pension System सर्वच कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा फायदा मिळावा आणि सोबतच सरकारवर कुठलाही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये याची काळजी सरकार घेत आहे. यासाठी काही उपाययोजना याआधीच कर्मचारी संघटनांनी सुचवलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करणे कितपत व्यवहार्य आहे याची देखील चाचपणी येत्या काळात घेतली जाणार आहे.

Read More

EPS 95: खाजगी नोकरीतील निवृत्त पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला पेन्शन कशी मिळेल? जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employment Provident Fund Organisation-EPFO) अंतर्गत खाते असणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळण्याची सुविधा आहे. पण त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना ही पेन्शन कशी मिळेल, याबाबत जाणून घेऊया.

Read More

Widow Pension Scheme : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

Maharashtra Widow Pension Scheme Benefits : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांच्या हितासाठी विधवा पेन्शन योजना सुरू केली. ही योजना जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आली. विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त सर्व विधवा महिला आणि गरीब कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना दिला जातो.

Read More

PPF Update: जाणून घ्या PPF गुंतवणूकदारांसाठी 5 एप्रिल दिवस का आहे विशेष?

PPF Policy : पीपीएफ (PPF) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ही केंद्र सरकारची लोकप्रिय अशी बचत योजना आहे. या योजनेत हमी परताव्या बरोबरच कर सवलतही मिळते. या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत ठरवला जातो. यावेळी एप्रिल ते जून 2023 करीता 7.1 एवढा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

Read More

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांना पेन्शन देणाऱ्या योजनेची शेवटची तारीख 31 मार्च! घाई करा!

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्या अंतर्गत अर्जदाराला वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. भारत सरकारने ही योजना 2017 साली आणली होती. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाते.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेसाठी अर्थमंत्री नवा फॉर्म्युला आणण्याच्या तयारीत

National Pension Scheme आणि Old Pension Scheme शी निगडित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याद्वारे NPS आणि OPS संबंधी प्रश्नांवर सुवर्णमध्य काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Read More

नवीन पेन्शन योजनेचा केंद्रीय समिती आढावा घेणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घोषणा

New Pension Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) लोकसभेत वित्त विधेयक 2023 मांडताना नवीन पेन्शन योजनेबाबत (New Pension Scheme) मोठी घोषणा केली. त्यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एनपीएसचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Read More

Old Pension Scheme: संप मिटला, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना तत्वतः मंजुरी!

Old Pension Scheme: येत्या 3 महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आज (दि. 20 मार्च) दुपारी 2 वाजता सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संपकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून, उद्यापासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहतील असे सुकाणू समितीने जाहीर केले.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले, सरकारी कामकाज ठप्प

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना (OPS) जोवर पूर्वरत केली जात नाही तोवर आंदोलन, संप मागे घेतला जाणार नाही यावर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठमोठी आंदोलने होत आहेत. आमदार-खासदारांना जर निवृत्तिवेतन दिले जात असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना का नाही? असा सवाल केला जातो आहे.

Read More

Old Pension Scheme: कर्मचारी संपावर ठाम! सचिवांशी झालेली बैठक निष्फळ

जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. याआधी मुख्य सचिवांशी संपकऱ्यांची एक बैठक पार पडली. ही बैठक निष्फळ ठरली असून आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुढील बैठक होणार आहे.

Read More

Managing Finance After Death of Husband: विधवांसाठी पेन्शन देणाऱ्या योजना कुठल्या?

Managing Finance After Death of Husband : पतीचा अचानक मृत्यू झाला आणि स्त्री कमावती नसेल तर तिच्यावरचं संकट दुहेरी असतं. एक तर उर्वरित आयुष्य एकट्याने काढायचं आणि दुसरं म्हणजे घरातला कमाईचा स्त्रोत कमी झालेला असतो. अशावेळी विधवा महिलेच्या आयुष्याला आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारच्या काही पेन्शन योजना आहेत तुम्हाला माहीत आहेत?

Read More

NPS Switch To OPS: केंद्र सरकारमधील हे कर्मचारी करू शकतात NPS'चा जुनी पेंशन योजना OPS'मध्ये बदल; कसा ते जाणून घ्या

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये समाविष्ट असलेल्या निवडक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 वर स्विच करण्याचा एक पर्याय उपलब्ध होणार आहे, ज्याला जुनी पेन्शन योजना (OPS) म्हणून ओळखले जाते. पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने (DoPPW) नुकतेच एक परिपत्रक जारी केले ज्यात जुन्या पेन्शन योजनेवर स्विच करण्यासाठी कोण पात्र आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Read More